Gautam Adani : एका अहवालाने 50 हजार कोटी गमावले! आता गौतम अदानी यांची काय असेल खेळी

| Updated on: Mar 29, 2023 | 10:39 AM

Gautam Adani : अदानी समूहाला एका रिपोर्टने जो तडाखा दिला आहे. त्याची भरपाई आता किती दिवसांत पूर्ण होईल हे काही सांगता येत नाही. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूह अजूनही मोठ्या यशासाठी चाचपडत आहे.

Gautam Adani : एका अहवालाने 50 हजार कोटी गमावले! आता गौतम अदानी यांची काय असेल खेळी
Follow us on

नवी दिल्ली : मंगळवारी अदानी समूहाच्या शेअरमध्ये (Adani Share) पुन्हा मोठी घसरण दिसून आली. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाची वाटचाल चाचपडत सुरु आहे. पण मंगळवारी एका अहवालातील दाव्यानंतर घसरणीचे सत्र सूरु झाले. या अहवालात (Report) दावा करण्यात आला आहे की, अदानी समूहाने बँकांमध्ये पूर्णपणे 2.15 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली नाही. त्यानंतर अदानी समूहाने यासंबंधीचे स्पष्टीकरण दिले. त्यात तिमाही निकालात शेअर्सची माहिती देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला. हा अहवाल बदनाम करण्याचा कट असल्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले. मंगळवारी शेअरमध्ये मोठी पडझड झाली. अदानी समूहाला जवळपास 50 हजार कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा फटका सहन करावा लागला. गेल्या तीन दिवसांत हे नुकसान 80 हजार कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

अदानी समूह सावरला होता

GQG ने अदानी एंटरप्राईजेस, अदानी पोर्टस, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणूक केल्याच्या बातमीनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी आली होती. हे शेअर पुन्हा चमकले होते. या समूहाच्या बहुतांश शेअर्सने चांगली कामगिरी केली होती. 24 जानेवारी रोजी हिंडनबर्ग अहवालानंतर आता कुठे हा समूह सावरत होता. पण गेल्या आठवड्यात पुन्हा या समूहाविषयी नकारात्मक वृत्त हाती येऊ लागले. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे बाजार भांडवलात एकूण 10.31 लाख कोटी रुपयांचे नुकसान दिसून आले.

हे सुद्धा वाचा

काय होत आहे घसरण

द केनच्या अहवालानुसार, अदानी यांनी 2.15 दशलक्ष डॉलरचे कर्ज खरंच चुकतं केलं का, याबाबत शंका व्यक्त केली. थकीत कर्जापोटी कारवाई टाळण्यासाठी अदानी समूहाने पूर्ण कर्जाची परतफेड केली नाही तर, कर्जातील काही रक्कम जमा केल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्री पेमेंट अनाऊसमेंटनंतर बँकांनी केवळ अदानी पोर्ट्सचे तारण शेअर मुक्त केल्याचा दावा द केनने केला आहे.

अदानी समूहाचे उत्तर

अदानी समूहाने या अहवालाला प्रतित्युर दिले आहे. त्यांनी या अहवालातील आरोप फेटाळले आहेत. 2.15 दशलक्ष अमेरिकन डॉलर कर्ज पूर्णपणे चुकतं केल्याचा दावा अदानी समूहाने केला आहे. त्यामुळेच बँकेने सर्वच तारण शेअर मुक्त केल्याचे समूहाचे म्हणणे आहे. या कंपनीचे सीएफओ जुगशिंदर सिंह यांनी एक ट्विट केले आहे. त्यात तिमाही निकालात या शेअर्सविषयीची अपडेट कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. किती पेमेंट केले, याची माहिती सर्वांनाच पाहात येईल, पडताळा करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.