GOLD PRICE TODAY: महाराष्ट्रात पन्नास हजारी ‘गोल्डन’ डंका; मुंबईत सोनं महागलं, जाणून घ्या आजचे भाव

| Updated on: Feb 18, 2022 | 9:05 PM

मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46300 व 24 कॅरेट सोन्याला 50510 रुपये भाव मिळाला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सोन्याच्या भाव पन्नास हजारांच्या पलीकडे कायम राहिला.

GOLD PRICE TODAY: महाराष्ट्रात पन्नास हजारी ‘गोल्डन’ डंका; मुंबईत सोनं महागलं, जाणून घ्या आजचे भाव
Gold
Follow us on

मुंबई : सोन्याच्या भावात घसरणीनंतर तेजीचा आलेख दिसून आला. आज (शुक्रवारी) राजधानी मुंबईत सोन्याच्या भावात भाववाढ पाहायला मिळाली. मुंबईत सोन्याच्या भावात प्रति तोळा 450 रुपयांची तेजी नोंदविली गेली. मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46300 व 24 कॅरेट सोन्याला 50510 रुपये भाव मिळाला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सोन्याच्या भाव पन्नास हजारांच्या पलीकडे कायम राहिला. मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भावात सरासरी 500 रुपयांची तेजी दिसून आली. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या भाववाढीमुळे सोने गुंतवणुकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. शेअर्स बाजारातील अस्थिरता (SHARE MARKET), आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थघडामोडी यामुळे गुंतवणुकदारांत (Investors) अस्थिरतेचं वातावरण दिसून आलं होतं. दरम्यान, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीकडे अनेकांनी आपला मोर्चा वळविला आहे. आगामी काही दिवसांत भाववाढ कायम राहील अशा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.

देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :

• मुंबई- 50,510 रुपये (540 वाढ)
• पुणे- 50,400 रुपये (500वाढ)
• नागपूर- 50,560 रुपये (540 वाढ)
• नाशिक- 50,400 रुपये (500 वाढ)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):

• मुंबई- 50,510 रुपये (540वाढ)
• पुणे- 46,200 रुपये (440वाढ)
• नागपूर- 50,400 रुपये (500वाढ)
• नाशिक- 46,200 रुपये (440वाढ)

गुंतवणुकदारांचा मोर्चा ‘सोन्या’कडे?

शेअर बाजाराला मोठ्या पडछडीला सामोरे जावं लागलं आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेक जण सोन्याला पहिली पसंती देतात. शेअर बाजारातील अस्थिरता, आजवरच्या सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याचे पडसाद सोने बाजारावर दिसून येत असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

संजय राऊतांना ‘मातोश्री’ डळमळीत करायची आहे का?, चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल; ‘सामना’चा संपादक बदलण्याचाही सल्ला!

नव्या रेल्वे मार्गिकेमुळे मुंबईकरांना होणार चार फायदे, आजपासून 36 नव्या लोकल सुरू करणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा