TVK Vijay Wife Gold Assets: पत्नीकडे 4 कोटींचे सोने, 600 कोटींचा मालक थलपती विजयकडे किती Gold?

TVK Vijay Wife Gold Assets: 600 कोटींहून अधिकच्या संपत्तीचा मालक असलेल्या थलपती विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिच्याकडे कोट्यवधींचे सोने-चांदी आणि रत्न आहेत. विजयकडे किती सोने आहे?

TVK Vijay Wife Gold Assets: पत्नीकडे 4 कोटींचे सोने, 600 कोटींचा मालक थलपती विजयकडे किती Gold?
थलपती विजय, संगिता विजय
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 07, 2026 | 2:05 PM

TVK Vijay Wife Gold Assets: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजयने चमत्कार दाखवला. तमिलगा वेट्टी कजगम(TVK) या त्याच्या पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला. या निवडणुकीत त्याच्या पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. थलपती विजयने निवडणूक शपथपत्रात त्याच्या संपत्तीची माहिती दिली आहे. तो 600 कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे. त्याच्या पत्नीकडे 4 कोटींचे सोन्याचे दागिने आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार विजयकडे किती आहे सोने?

थलपती विजयकडे 1.20 कोटींचे सोने

टीव्हीके संस्थापक विजय याच्या निवडणुकीच्या शपथपत्रावर नजर टाकली असता त्याच्या एकूण संपत्तीचा अंदाज येतो. थलपतीने सांगितले की त्याच्याकडे 1.20 कोटी रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत. तर त्याची पत्नी संगिता सोर्णलिंगम हिच्याकडे त्याच्यापेक्षा अधिक सोने, चांदी आणि रत्नआभूषणं आहेत. विजयच्या शपथपत्रानुसार, त्याच्याकडे एक कोटींहून अधिक रुपयांचे 883 ग्रॅम सोने आहे. याशिवाय 15 लाख रुपयांची चांदी आहे. त्याच्याकडे चल आणि अचल संपत्ती आहे.

पत्नी संगिताकडे 4 कोटींचे सोने

विजयने त्याच्याकडील कोट्यवधी सोन्याचा तपशील दिला आहे. तर त्याच्या पत्नीकडे त्याच्यापेक्षा चारपट अधिक सोने आहे. विजय याच्या शपथपत्रानुसार, त्याच्या कुटुंबातील सोने आणि चांदीच्या दागिन्यातील मोठा वाटा त्याच्या पत्नीकडे आहे. संगिता विजय हिच्याकडे 3.1 किलो सोने आहे. त्याची किंमत बाजारभावानुसार, जवळपास 4.07 कोटी इतकी आहे. याशिवाय तिच्याकडे चांदी आणि रत्नांचा खजिना आहे. त्यांची किंमतही बाजारात कोट्यवधी रूपयांची आहे.

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय याच्या पत्नीकडे सोन्याच्या दागिन्याशिवाय जवळपास 4.75 लाख रुपयांची दोन किलो चांदी सुद्धा आहे. अर्थात भावानुसार या चांदीच्या मुल्यात चढउतार होतो. संगिता विजय हिच्याकडे सोने आणि चांदीच्या दागिन्याव्यतिरिक्त जवळपास 1 कोटी रुपये मूल्य असलेले 134.91 कॅरेटचे हिरे आहेत.

दरम्यान विजय याची पत्नी संगिता सोर्णलिंगम हिने या फेब्रुवारी महिन्यात तामिळनाडूतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठई अर्ज दाखल केला आहे. विवाहबाह्य संबंधाशिवाय विजय याच्यावर तिने अनेक आरोप केले आहेत. गेल्या 25 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांच्या नात्यात ऐन टर्निंग पॉईंटला कटुता आली आहे. इतके आव्हानं पेलूनही टीव्हीके हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे.

Follow Us