मोठी बातमी: ESIC मध्ये 12वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 6552 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 12 वी पास आणि पदवीधर असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. (Sarkari Naukri ESIC Recruitment)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:55 PM, 2 Mar 2021
मोठी बातमी: ESIC मध्ये 12वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 6552 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
ईएसआयसी प्रतािनिधीक फोटो

नवी दिल्ली: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये 6552 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 12 वी पास आणि पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अर्ज करण्या 2 मार्च पासून सुरुवात झाली आहे. (Sarkari Naukri 2021 ESIC announced vacancies for 12th pass and graduate candidates)

कोणत्या पदांसाठी भरती?

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर, स्टेनोग्राफर यासह इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी 2 मार्च ते 31 मार्च पर्यंत अर्ज करता येणार आहे.

पदांची संख्या

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये एकूण 6552 पदांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर या पदांसाठी 6306 तर स्टेनोग्राफर पदासाठी 246 पदांवर भरती होणार आहे. अधिकृत जाहिरात आणि पदांची संख्या यासाठी esic.nic.in या वेबसाईटवर भेट देणे आवश्यक आहे.

अर्ज कोण करणार?

कर्मचारी राज्य विमा निगमने जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे 12 उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असलं पाहिजे. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. यासोबत त्यांना संगणक वापरण्याचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणं वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या

BARC | भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये पदभरती, 78 हजारांपर्यंत पगार मिळणार

CBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक

(Sarkari Naukri 2021 ESIC announced vacancies for 12th pass and graduate candidates)