वाईन शॉप मॅनेजरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दहा लाखांची लूट, दुकानातील कर्मचाऱ्यालाच बेड्या

अहमदनगर शहरातील प्रकाश वाईन्स झोपडी कॅन्टीन येथील दुकानाचे व्यवस्थापक आशीर बशीर शेख हे रात्री घरी जात असताना हा प्रकार घडला होता. यावेळी त्यांच्या मोटारसायकलच्या टाकीवर ठेवलेली 10 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने चोरुन नेल्याचा आरोप झाला होता.

वाईन शॉप मॅनेजरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दहा लाखांची लूट, दुकानातील कर्मचाऱ्यालाच बेड्या
वाईन शॉप मॅनेजरची लूट
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 9:46 AM

अहमदनगर : अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन येथील प्रकाश वाईन्स या दुकान व्यवस्थापकाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लूटमार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. दहा लाख सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती.

नेमकं काय घडलं?

अहमदनगर शहरातील प्रकाश वाईन्स झोपडी कॅन्टीन येथील दुकानाचे व्यवस्थापक आशीर बशीर शेख हे रात्री घरी जात असताना हा प्रकार घडला होता. यावेळी त्यांच्या मोटारसायकलच्या टाकीवर ठेवलेली 10 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने चोरुन नेल्याचा आरोप झाला होता.

दुकानामध्ये काम करणारा कामगारच आरोपी

व्यवस्थापक आशीर बशीर शेख यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार एलसीबी पथकांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हा प्रकाश वाईन्स या दुकानामध्ये काम करणारा कामगार लखन वैरागर याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पगाराचे पैसे नेणाऱ्या चालकाची लूट

दुसरीकडे, मौज मजा करण्यासाठी दरोडा टाकणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. कामगारांच्या पगाराचे पैसे घेऊन जात असताना वाल्हेकर वाडी भागातील साई स्टील कंपनीच्या चालकाला काही दिवसांपूर्वी मारहाण करुन लुटण्यात आले होते.

दरोडा प्रकरणाचा तपास करताना दरोडा विरोधी पथकाला ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ याच्यावर संशय आला. त्यानंतर चौकशी केली असता त्यानेच आपल्या मित्रांना पैसे घेऊन जात असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे कासीम खुर्शीद, यश गणेश आगवणे आणि सागर आदिनाथ पवार यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.

अभिनेत्रीच्या घरात घुसून लूट

दरम्यान, मॉडेल-अभिनेत्री अलंकृता सहायला (Alankrita Sahai) घरात ओलीस ठेवून चाकूच्या धाकाने तिची लूट केल्याची घटना दिल्लीत उघडकीस आली होती. सेक्टर -27 मधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. दुपारी तीन अज्ञात मुखवटेधारी चोरांनी तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर अलंकृताला ओलीस ठेवून चाकूच्या धाकाने 6.50 लाख रुपये लुटण्यात आल्याचा आरोप आहे. भीतीने तिने स्वतःला वॉशरूममध्ये बंद केले होते.

इंदापुरात आवळा देऊन कोहळा काढला

“आवळा देऊन कोहळा काढणे” या म्हणीचा प्रत्यय नुकताच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पहावयास मिळाला आहे. पैसे लुटण्याच्या इराद्याने चोरट्यांनी नामी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे. चोरट्यांनी चक्क रस्त्यावर दोन-चार नोटा फेकल्या होत्या. रस्त्यावर पडलेल्या या नोट उचलण्याच्या मोहापायी जे बाईकस्वार उतरायचे, त्यांच्या दुचाकीवरील ऐवज लुटून पसार होण्याचा त्यांचा प्लॅन होता. या योजनेनुसारच बाईकवरुन खाली उतरलेल्या एका दुचाकीस्वाराचे 2 लाख 33 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना गुरुवारी दुपारी इंदापूर शहरात घडली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | रस्त्यावर दोन-चार नोटा फेकल्या, बाईकस्वार आमिषाला भुलताच त्याचे सव्वादोन लाख उडवले

बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरात दरोडा, ओलीस ठेवून साडेसहा लाखांची लूट

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.