मुंबईत ड्रग्जविरोधी कारवायांचं सत्र सुरुच, डोंगरी परिसरातून 1 कोटीचे ड्रग्ज जप्त

मुंबईत ड्रग्जविरोधी कारवायांचं सत्र सुरुच, डोंगरी परिसरातून 1 कोटीचे ड्रग्ज जप्त

डोंगरी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 1 कोटी 10 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

Nupur Chilkulwar

|

Dec 12, 2020 | 4:46 PM

मुंबई : मुंबईत अंमली पदार्थविरेधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 10 लाखांचे ड्रग्ज (Drugs Seized In Dongari) जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण 1 कोटी 18 लाख 78 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. तसेच, एका महिलेलाही अटक करण्यात आले आहे (Drugs Seized In Dongari).

डोंगरी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 1 कोटी 10 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यासोबतच 8 लाख 78 हजारांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. अशी एकूण 1 कोटी 18 लाख 78 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

या कारवाईत सनम तारीक सय्यद या 25 वर्षांच्या महिलेला ड्रग्ज आणि रोख रक्कमेसहित अटक करण्यात आली आहे. डोंगरीतल्या फेब हाऊसमध्ये धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत 1 किलो 105 ग्रॅम मेफीड्रॉन नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात लाखो, करोडो रुपयांच्या ड्रग्जतस्करीत सहभागी असणाऱ्या दोन महिलांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज संबंधी अनेक कारवाया समोर येत आहेत. यामध्ये अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांचीही नावं समोर आली आहेत. त्यानंतर सतत ड्रग्ज पॅडलर्सविरोधी कारवायांचं सत्र सुरुच आहे.

Drugs Seized In Dongari

संबंधित बातम्या :

मुंबईत पुन्हा 50 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त, कुर्ला परिसरातून महिलेला अटक

ड्रग्ज पेडलर्सचं डेअरिंग वाढलं, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर हल्ला

ड्रग्ज पेडलर्ससह चौघांना अटक, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ड्रग्ज प्रकरणातील कोरोना पॉझिटीव्ह आरोपीचे रुग्णालयातून पलायन; मुंबई पोलिसांची शोधाशोध

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें