AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅट्रिमोनिअल साईटवरुन भेट झाली, साखरपुडाही झाला, नंतर लग्नास नकार दिला, ‘लखोबा लोखंडे’ला अटक

मॅट्रिमोनिअल साईटवर त्यांची ओळख झाली. त्यानंतर या वकील महिलेने त्याच्या भुलथाबांना बळी पडत साखरपुडाही केला. त्यानंतर तो रोज घरी येऊन लैंगिक शोषण करु लागला. मग मात्र त्याने लग्नास नकार दिला, त्यानंतर या महिलेने या लखोबा लोखंडे विरोधात पोलिसांत तक्रार दिली....

मॅट्रिमोनिअल साईटवरुन भेट झाली, साखरपुडाही झाला, नंतर लग्नास नकार दिला, 'लखोबा लोखंडे'ला अटक
| Updated on: Jun 06, 2025 | 9:58 PM
Share

मॅट्रिमोनिअल साईटवर फेक प्रोफाईल तयार करुन लग्नाळू महिलांना फसवणाऱ्या एका लखोबा लोखंडेला नागपुर पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने नागपूरातील एका वकील महिलेला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार तर केलेच शिवाय या महिलेच्या भावाकडून शेअर बाजाराच्या नावाने पैसे उकळून त्याचीही लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

नागपुरातील वकील महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या शारीरिक शोषण करणाऱ्या एका लखोबा लोखंडे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. त्याने या महिलेच्या भावाची आर्थिक फसवणूक केल्याचेही उघडकीस आले आहे. नागपूरमध्ये राहणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेने लग्नासाठी तिचे प्रोफाईल विवाह संकेतस्थळावर नोंदवले होते आणि त्यावरून कल्पेश कक्कड याची ओळख तिच्याशी झाली. यानंतर दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला. त्यानंतर त्याने लग्नाआधीच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. महिलेच्या घरी येऊन तिला गुंगीचे औषध देऊन महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आलं….

या सोबतच महिलेच्या भावाला शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देतो असे आमिष दाखवत त्याच्याकडूनही 12 लाख रुपये उकळले. त्याचे मन भरल्यानंतर तो लग्नास टाळाटाळ करु लागला. त्यानंतर या महिलेने या तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करीत त्याला शोधून काढले. अखेर आरोपी कल्पेश कक्कड याला मुंबईतून अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरुण क्षिरसागर यांनी सांगितले.

लखोबा लोखंडे निघाला

आरोपी कल्पेश कक्कड याची पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केली. त्याने अशाच पध्दतीने अनेक महिलांची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून या लखोबा लोखंडे याने किती महिलांची फसवणूक केली याचा शोध घेतला जात आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...