Election Result 2022 Live: गोव्यात भाजप नेत्यांचे सूर बदलले; आता म्हणतात छोट्या पक्षांना सोबत घेणार अन्….

Goa Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: पाच राज्यातील निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. तासाभरात कौल येतील आणि दुपारी बारा वाजेपर्यंत कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येईल, याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Election Result 2022 Live: गोव्यात भाजप नेत्यांचे सूर बदलले; आता म्हणतात छोट्या पक्षांना सोबत घेणार अन्....
गोव्यात कोणाचे सरकार येईल हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 5:45 PM

पणजीः गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचे मांडे निकालाआधीच खाणारे, स्वबळाच्या अतिआत्मविश्वासावर वावरणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे एक्झिट पोलनंतर सूर बदलले आहेत. आता सत्ता स्थापनेसाठी आम्ही छोट्या पक्षांना सोबत घेऊ असा सूर येथे भाजप नेते आळवतायत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले. त्यात गोव्यात (Goa Assembly Election) कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. मात्र, सर्वाधिक जागा भाजपला मिळण्याचा अंदाज टीव्ही 9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. या अंदाजानंतर भाजप नेत्यांनी आपले सूर बदलल्याचे समोर येतेय. तर दुसरीकडे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर यांनी आम्ही ठरणार किंग मेकर बनणार असल्याचे म्हटले आहे.

एक्झिट पोल काय सांगतो?

टीव्ही 9 च्या एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार, गोवा विधानसभेतील एकूण 40 जागांपैकी भाजपला 17 ते 19 जागा मिळतील. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना 11 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आप गोवा विधानसभेत आपले खाते उघडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आपचे 1 ते 4 उमेदवार निवडून येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.

आता भाजप नेते म्हणतात…

निवडणुकीच्या प्रचारात 22 प्लसचा आत्मविश्वास व्यक्त करणारे भाजप नेते आता सत्तास्थापनेसाठी छोट्या पक्षांनाही बरोबर घेऊ असे म्हणतायत. गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. सत्ता स्थापनेसाठी आम्ही अपक्षांनाही सोबत घेणार आहोत. दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर यांनी आम्ही ठरणार किंग मेकर बनणार असल्याचे म्हटले आहे. दुपारपर्यंत हे सारे चित्र स्पष्ट होईल, यात शंकाच नाही.

गोव्याचे बलाबल काय?

गोवा विधानसभेच्या एकूण जागा 40 जागा आहेत. सध्या गोव्यात भाजपचे 17 आमदार असून, काँग्रेसचे 13 आमदार आहेत. तर मगोपचे 3 आणि गोवा फॉरवर्डचे 3 आमदार होते. मात्र, अनेक आमदारांनी निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर राजीनामे देत उमेदवारीसाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षांतर केले आहे. तर अनेकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.

मतमोजणी सुरू

पाच राज्यातील निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. तासाभरात कौल येतील आणि दुपारी बारा वाजेपर्यंत कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येईल, याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

Goa Election Result | गोव्यात कुणाची सत्ता? भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, निकाल काही तासांत येणार!

Goa Election Exit Poll Result 2022 : गोव्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघात कोण बाजी मारणार? जाणून घ्या पणजीसह महत्वाच्या लढतींचा निकाल

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.