प्रयागराजमध्ये हवेतून उडणारी बस आणणार, जो मैं कहता हूं, वह करके दिखाता हूं: गडकरी
उत्तर प्रदेशात निवडणुकीचा ज्वर अधिकच शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक पक्षाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे आश्वासने दिली जात आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी यांनीही मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठं आश्वासन दिलं आहे. प्रयागराजमध्ये हवेतून उडणारी बस आणणार आहोत.

प्रयागराज: उत्तर प्रदेशात निवडणुकीचा (UP Assembly Election 2022) ज्वर अधिकच शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक पक्षाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे आश्वासने दिली जात आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनीही मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठं आश्वासन दिलं आहे. प्रयागराजमध्ये हवेतून उडणारी बस आणणार आहोत. त्याचाा डीपीआर तयार करण्यात येत आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. तसेच जो मैं कहता हूं वह करके दिखाता हूं, असंही त्यांनी जाहीर केलं. या हवेतून उडणाऱ्या बसबाबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच दिल्लीहून (delhi) प्रयागराजला सी प्लेनने जावं आणि त्रिवेणी संगमला उतरावं अशी आपली इच्छा असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी प्रयागराज आणि उत्तर प्रदेशाच्या विकासावर अधिक जोर दिला.
हायड्रोजन फ्यूलचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन होतं. त्याद्वारे इथेनॉल तयार करण्यात येणार आहे. या इथेनॉलचा वापर वाहनांमध्ये टाकण्यासाठी करण्यात येईल. आता काही वाहने पेट्रोलवर चालतात. त्यांना प्रति लीटर पेट्रोलमागे 110 रुपये मोजावे लागत आहेत. इथेनॉलचा प्रयोग केल्यावर हा खर्च 68 रुपयांवर येणार आहे. मी असा मंत्री आहे, जो बोलतो तेच करून दाखवतो, असं नितीन गडकरी म्हणाले.
माझ्याकडे द्रोपदीची थाळी
माझ्या डिपार्टमेंटकडे पैशाची काहीच कमतरता नाही. मी कोटी कोटीच्या गोष्टी करत असतो. माझ्याकडे द्रोपदीची थाळी आहे. आतापर्यंत 50 लाख कोटींची कामे केली आहेत. भारतमातेची प्रगती आणि विकास करणं हाच भाजपचा एकमेव कार्यक्रम आहे, असंही ते म्हणाले.
रस्त्यांचे काम जोरात
उत्तर प्रदेशात 2014 पासून 2021 पर्यंत 90,000 कोटी खर्च करून 4,722 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. तसेच, 1,60,000 कोटींचे रस्ते बनवले जात आहेत. गेल्या तीन वर्षात भरपाईपोटी शेतकऱ्यांना 26,000 कोी रुपये देण्यात आले आहेत. तसेच 13,000 कोटीच्या खर्चात 16 बायपास आणि 15,000 कोटीच्या खर्चाने 20 नवे बायपास बनवले जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 16 February 2022 pic.twitter.com/XxQIcpHKNw
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2022
संबंधित बातम्या:
