अभिनेत्री जान्हवी कपूर कोरोनातून मुक्त, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती

अभिनेत्री जान्हवी कपूरला कोरोनाचा संसर्ग झाला होता. जान्हवीची बहीण खुशी कपूरही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. जान्हवीने इन्स्टाग्रामवर याबाबतची पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर कोरोनातून मुक्त, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरला कोरोनाची लागण झाली होती. जान्हवीची बहीण खुशी कपूरही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. जान्हवीने इन्स्टाग्रामवर याबाबतची पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ३ जानेवारीला जान्हवी आणि खुशी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. आपण होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असल्याचं तिने म्हटलं आहे. पण आता टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं जान्हवीने म्हटलंय.

जान्हवी कपूरची इन्स्टाग्राम पोस्ट

मित्रांनो, 3  जानेवारीला माझी आणि खुशीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचं आम्ही पालन करतो आहोत. आम्ही दोघी होम आयसोलेशनमध्ये होतो. आता आम्ही टेस्ट केली असता आमचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सुरुवातीचे २ दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते.  मग हळूहळू परिस्थिती सुधारत गेली. या महामारीपासून वाचण्यसाठी मास्क लावणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी मास्क लावा. लस घ्या आणि स्वत:ची आणि घरच्यांची काळजी घ्या, असं जान्हवीने आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

जान्हवीने काही फोटो शेअर केलेत. ज्यात ती थर्मामीटर द्वारे टेंपरेचर चेक करताना दिसते आहे. तर कधी पुस्तक वाचताना, पेंटिंग करताना दिसतेय.

अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर आणि करण बुलानी यांना देखील गेल्या महिन्यात कोविडचा संसर्ग झाला होते. पण काल अर्जुनचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खानला कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. कॉमेडियन वीरदासलाही कोरोनाने गाठलंय. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्याने सोशल मीडियाच्या माध्यामातून सांगितलं आहे.

संबंधित बातम्या-

‘बाप तसा बेटा, नसीरुद्दीन शहांच्या मुलाच्या बाबतीत खोटं’, 20 व्या वर्षी करिअरला सुरुवात होऊनही अपयशी

फोटोग्राफर मानव मंगलानी यांचा सायना नेहवालला पाठिंबा, तर सिद्धार्थला कव्हर करणार नसल्याची घोषणा

विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची लेक वामिकाचा आज पहिला वाढदिवस, विरूष्काच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Published On - 5:55 pm, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI