रणवीर सिंहच्या आयुष्यात मोठा ‘प्रलय’, Don3 नंतर हा सिनेमा सुद्धा हातातून जाणार? बातमी ऐकून चाहते हैराण
Ranveer Singh Pralay: रणवीर सिंह मागील संकटांची मालिका सुरूच आहे. 'डॉन 3' ला रामराम ठोकण्याचा निर्णय त्याला जड जात आहे. 'डॉन 3' त्याच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे समोर येत आहे. आता हा सिनेमा त्याच्या हातातून जाणार का? याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

Ranveer Singh Pralay: धुरंधर आणि धुरंदर – द रिव्हेंज या दोन्ही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर गल्ला जमावला. दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. त्यातच रणवीर सिंह याने ‘डॉन 3’ ला रामराम ठोकला. पण त्याचा हा निर्णय अडचणीचा ठरला आहे. हा वाद फिल्म इंडस्ट्रीजची शिखर संस्था ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉईज’ (FWICE) पर्यंत पोहचला. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या तक्रारीनंतर फेडरेशनने रणवीर सिंह याला सहकार्य न करण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ या संघटनेशी संबंधित सर्व सदस्य, दिग्दर्शक, निर्माता, कॅमेरामन, लाईटमन, एडिटर, आर्ट डायरेक्टर आणि स्पॉट बॉईज हे रणवीर सिंह याच्यासोबत काम करू शकणार नाही. फेडरेशनच्या दाव्यानुसार त्यांचे एकूण 4 लाखांहून अधिक सदस्य आहेत. त्याचा परिणाम रणवीर सिंह याच्या आगामी ‘प्रलय’ सिनेमावर सुद्धा होण्याची शक्यता आहे. यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास रणवीर सिंह याने नकार दिला आहे.
काय आहे वाद?
डॉन बॉलिवूडचा एक सुपरहिट सिनेमा आहे. सर्वात अगोदर 1978 मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर 2006 आणि 2011 मध्ये शाहरूख खान याची भूमिका सुद्धा हिट ठरली. फरहान अख्तर याने 2023 मध्ये डॉनच्या पुढील सिनेमात रणवीर सिंह असेल अशी घोषणा केली. त्यावर अनेकांनी नाराजी जाहीर केली. शाहरूख खानच्या चाहत्यांनी त्याला विरोध केला. पण धुरंधर हिट ठरल्यावर डॉनची पटकथा योग्य नसल्याचे कारण देत रणवीर सिंह याने हा चित्रपट नाकारला. तिथून वादाला सुरुवात झाली. रणवीरवर टीका झाली. त्याने यापूर्वी सु्द्धा असेच काही सिनेमे अचानक सोडल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला.
रणवीर सिंह याच्या ‘प्रलय’वर संकट
आता FWICE ने रणवीर सिंह याला साईडलाईन करण्याचे फर्मान काढल्याचा परिणाम त्याच्या आगामी काही सिनेमांवर होण्याची दाट शक्यता आहे. त्याचा अजून एक मोठा चित्रपट ‘प्रलय’ त्यामुळे संकटात सापडण्याची शक्यता आहे. निर्माते हंसल मेहता यांचा मुलगा जय मेहता हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे बजेट 300 कोटींच्या घरात आहे. प्रलय हा चित्रपट एक झोम्बी थ्रिलर आहे. विशेष म्हणजे या बिग बजेट सिनेमात रणवीर सिंह हा लीड रोलमध्येच नाही तर निर्मात्याच्या भूमिकेतही आहे. FWICE चे बी एन तिवारी यांच्या मते, संघटनेचा कोणताही सदस्य रणवीर सिंह याच्या या चित्रपटात काम करणार नाही. त्यामुळे प्रलयचे शुटिंग प्रभावित होईल. असाच काहीसा वाद हा परेश रावल, अक्षय खन्ना आणि रणवीर सिंह याची पत्नी दिपिका पादुकोण सोबतही झाला आहे.