Rocky Aur Rani Ki Prem Kahani : रणवीर-आलियाच्या प्रेमकथेत धर्मेंद्र, जया बच्चन, आणि शबाना आझमी लावणार तडका!

करण जोहरने आज आपला नवीन प्रोजेक्ट ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) जाहीर केला आहे. या चित्रपटाद्वारे करण 5 वर्षानंतर दिग्दर्शनाच्या जगात पाऊल टाकणार आहे. यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे करणने चित्रपटाच्या घोषणेसह सांगितले होते.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : रणवीर-आलियाच्या प्रेमकथेत धर्मेंद्र, जया बच्चन, आणि शबाना आझमी लावणार तडका!
शबाना, धर्मेंद्र, जया
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 9:31 AM

मुंबई : करण जोहरने आज आपला नवीन प्रोजेक्ट ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) जाहीर केला आहे. या चित्रपटाद्वारे करण 5 वर्षानंतर दिग्दर्शनाच्या जगात पाऊल टाकणार आहे. यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे करणने चित्रपटाच्या घोषणेसह सांगितले होते. आता करणने सांगितले आहे की, या चित्रपटात आणखी 3 दिग्गज कलाकार दिसणार आहेत (Dharmendra, Jaya Bachchan And Shabana Azmi will play an important role in Rocky Aur Rani Ki Prem Kahani film).

करण जोहरने एक गमतीशीर व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे की, रणवीर आणि आलियासोबत धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेमकथे’च्या दिग्गज कलाकारांना भेटा. या दिग्गज कलाकारांसह काम करण्यास उत्सुक आहे आणि त्यांना सेटवर पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.

व्हिडीओमध्ये रॉकी आणि राणी सर्वांनी आपल्या आजी-आजोबांचा परिचय करून देतात. धर्मेंद्र आणि जया या चित्रपटात रणवीरच्या कुटूंबाचा भाग असणार आहेत, तर शबाना आझमी आलियाच्या कुटूंबाचा भाग असणार आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

रणवीरच्या वाढदिवशी खास घोषणा

आज (6 जुलै) रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्त करणने आपला नवीन चित्रपट जाहीर केला आहे. एक व्हिडीओ शेअर करताना, त्याने लिहिले की, माझ्या खास दिवशीची एक खास घोषणा. रॉकी और रानी की लव्हस्टोरी सुपरनोवा आलिया भट्टसोबत सादर करत आहे. खुद्द करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटाचे लेखन इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी केले आहे.

करणने अखेर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसले होते. अलीकडेच करणने आपली टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी डीसीए सुरू केली आहे. करण या बॅनरखाली अनेक स्टार्स लॉन्च करणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याने या सेलेब्सविषयी माहिती दिली. यात शनाया कपूर, तृप्ती डीमरी, लक्ष्यसह अनेक सेलेब्रिटींचा समावेश आहे.

करण जोहर हा चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभाशाली सेलिब्रिटी आहे. तो लेखक, दिग्दर्शक, निर्माता, फॅशन डिझायनर, अभिनेता, सर्वात महागडा टीव्ही होस्ट तसेच एक चांगला मुलगा आणि दोन मुलांचा उत्तम पिता देखील आहे.

(Dharmendra, Jaya Bachchan, And Shabana Azmi will play an important role in Rocky Aur Rani Ki Prem Kahani film)

हेही वाचा :

Filhaal 2 Song : अक्षय कुमार-नुपूर सॅनॉनच्या केमिस्ट्रीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मने, पाहा नवं गाणं…

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : ‘गली बॉय’नंतर करण जोहरने पुन्हा बनवली रणवीर-आलियाची जोडी, पुढच्या वर्षी रिलीज होणार चित्रपट!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.