RRR | रिलीज आधीच वादात अडकला RRR चित्रपट, राजामौली यांच्या चित्रपटाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल!

बाहुबली' चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. अलीकडेच, कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकारांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता अशी बातमी आहे की, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट 'आरआरआर' कायदेशीर अडचणीत अडकला आहे.

RRR | रिलीज आधीच वादात अडकला RRR चित्रपट, राजामौली यांच्या चित्रपटाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल!
RRR
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 10:48 AM

मुंबई : ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. अलीकडेच, कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकारांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता अशी बातमी आहे की, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट ‘आरआरआर’ कायदेशीर अडचणीत अडकला आहे. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

चित्रपटात दोन स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने ‘आरआरआर’ चित्रपटाविरोधात ही जनहित याचिका दाखल केली असून, चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटात अनेक ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्यात आली आहे, त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने याकडे लक्ष देऊन कठोर पावले उचलावीत, असे या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.

‘आरआरआर’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली!

या प्रकरणी न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती व्यंकटेश्वरा रेड्डी यांनी सुनावणी केली. आता यानंतर पुढील सुनावणीची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे चित्रपट आधीच लटकला होता, त्यानंतर आता राजा माऊलीच्या चित्रपटावर ही संकटे आली आहेत. सध्या या प्रकरणी राजामौली किंवा आरआरआरच्या टीमकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

देशभरात वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 7 जानेवारीला प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोना प्रकरण वाढल्याने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. हिंदी पट्ट्यातील चाहत्यांनाही या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. कारण, अभिनेत्री आलिया भट्टही या चित्रपटात काम करत आहे. त्यामुळे अजय देवगणची झलक ‘RRR’ या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाबाबत चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

बिग बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या रिलीजमध्ये अनेक व्यत्यय आल्यानंतर निर्मात्यांना खूप तोटा सहन करावा लागत आहे. सध्या तरी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

हेही वाचा :

‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!

सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?

मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?

Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.