AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही चुकलो.. मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं सांगत चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुलाचं नाव 'जहांगीर' ठेवल्यावरून त्यांना सतत ट्रोल करण्यात येत आहे. या ट्रोलिंगला अखेर नेहाने प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही चुकलो.. मुलाचं नाव 'जहांगीर' का ठेवलं सांगत चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
Chinmay Mandlekar, Neha MandlekarImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 21, 2024 | 3:16 PM
Share

अभिनेता चिन्मय मांडलेकरने त्याच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. ‘भारत सोडून जा, अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात राहायला जा’, असे मेसेज चिन्मय आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांना येत आहेत. या ट्रोलिंगला अखेर प्रत्युत्तर द्यायचं नेहाने ठरवलं आणि इन्स्टाग्रावर तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नेहाने तिच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं, त्याचा खरा अर्थ काय आणि कोणावरून ठेवलं हे सर्व सविस्तर सांगितलं आहे. त्याचप्रमाणे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

काय म्हणाली नेहा मांडलेकर?

“सर्वांत आधी मी माझी जात सांगते, कारण सध्या ती सगळ्यात महत्त्वाची आहे. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे. सासरकडून मी द्वेष्टा कासार आहे. मी हिंदू आहे. माझे पती चिन्मय मांडलेकर हेसुद्धा हिंदूच आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीनंतर आम्ही प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जातोय. माझे पती हे पब्लिक फिगर असल्याने रसिक मायबापांना जर त्यांचं काम नाही आवडलं तर कानउघडणी करण्याचा हक्क आहे. पण सध्या ही ट्रोलिंग त्याच्या कामाबद्दल होत नाहीये. तर ही ट्रोलिंग आमच्या मुलाच्या नावावरून होतेय”, असं तिने सांगितलं.

मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याविषयीही तिने पुढे सांगितलं. ‘जहांगीर हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म 21 मार्च 2013 ला झाला. 21 मार्च रोजी जमशेदी नवरोज असतो. म्हणतो त्याचं नाव जहांगीर ठेवलं. या नावाचा अर्थ खूप सुंदर आहे. जहांगीर म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला जहांगीर. मी माझ्या दोन्ही मुलांची नावं त्याचा अर्थ फार गोड आहे म्हणून ठेवली आहेत. शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचंही नाव जहांगीर असं आहे. टाटा कुटुंब हे माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी आहे. ते नाव मला आवडलं, म्हणून मी जहांगीर असं ठेवलं. आता सुचवणारे लोक असेही सुचवतील की जगज्जेता तर मग तुम्ही पृथ्वीराज किंवा विक्रमादित्य का नाही ठेवलं? तर आपल्या मुलाचं नाव काय ठेवावं, हा हक्क एक पालक म्हणून आम्हाला आहे’, असं ती पुढे म्हणाली.

जहांगीर हे मुस्लीम नाव आहे असं म्हणत अनेकांनी ट्रोल केलं. त्यालाही नेहाने उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “आपण शतकानुशतके मुस्लीम बांधवांसोबत राहतो. आपले अनेक सुपरस्टार्स आणि क्रिकेटर्सदेखील मुस्लीम आहे. माझ्या नवऱ्याने बिट्टा कराटे पात्र साकारलं. तर म्हणाले, रोल फारच गांभीर्याने घेतला वाटतं. म्हणून मुलाचं नाव मुस्लीम ठेवलं. पण बिट्टा कराटेचं पात्र साकारायच्या आठ वर्षे आधी आम्ही आमच्या मुलाचं नाव ठेवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली तर म्हणतात की हा स्क्रीनवर जिरेटोप घालतो. पण खऱ्या आयुष्यात मुलाचं नाव जहांगीरच ठेवलं. तर स्क्रीनवर जिरेटोप घालण्याआधीच माझ्या मुलाचा जन्म झाला. मुलाचं नाव जहांगीर ठेवून आम्ही काय चूक केली नाही.”

“मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते की आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवूनसुद्धा स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं. आम्हाला क्षमा करा, आमची चूक झाली. आम्हाला वाटलेलं की महाराज हे एका नटाच्या नावाच्या पलीकडचे आहेत. त्यांचं काम, त्यांचं चरित्र खूप मोठं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवता आलं नाही, इथे आम्ही चुकलो. या स्पष्टीकरणानंतरही ट्रोलिंग थांबणार नाही हे मला माहीत आहे. पण माझ्याकडून मी माझ्ं काम केलंय”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

याआधीही चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या नावावरून ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हासुद्धा चिन्मयने उत्तर देऊन ट्रोलर्सचं तोंड बंद केलं होतं.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.