Viral Photo: घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले ईशा – भरत, ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

Esha Deol and Bharat Takhtani Pic: घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र दिसले ईशा देओल आणि भरत तख्ताना... 'त्या' एका फोटोमुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Viral Photo: घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले ईशा - भरत, त्या फोटोमुळे चर्चांना उधाण
| Updated on: Oct 06, 2025 | 2:35 PM

Esha Deol and Bharat Takhtani Pic: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल गेल्या काही महिन्यांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2024 मध्ये ईशा देओल हिने अनेक संकटांचा सामना केला. लग्नाच्या जवळपास 12 वर्षानंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर देखील ईशा आणि भरत मिळून दोन मुलींचा सांभाळ करत आहेत. परस्पर सहमतीने घटस्फोटा निर्णय घेतला… असं स्पष्टीकरण अभिनेत्रीने दिलं.

ईशा हिला घटस्फोट दिल्यानंतर काही महिन्यात भरत याने दुसऱ्या महिलेसोबत प्रेमाची कबुली दिला आणि सोशल मीडियावर महिलेसोबत फोटो पोस्ट ‘तुझं माझ्या कुटुंबात स्वागत आहे…’ असं कॅप्शन दिलं. ज्यामुळे भरत दुसऱ्या लग्नासाठी सज्ज असल्याची चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये जोर धरू लागली. अशात सोशल मीडियावर आणखी फोटो तुफान व्हारल होत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये भरत आणि ईशा दोघे एकत्र दिसत आहेत. फोटोमध्ये ईशा देओल, बहीण अहाना देओल, भरत तख्तानी आणि त्यांचा एक चांगला मित्र दिसत आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत भरत याने कॅप्शनमध्ये ‘फॅमिली टाईम’ असं लिहिलं आहे.

अनेक वाद त्यानंतर घटस्फोट होऊन सुद्धा ईशा आणि भरत पुन्हा एकत्र दिसत आहेत. त्यामुळे ईशा आणि भरत पुन्हा एकत्र दिसणार का? या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल होत आहे.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांची लव्हस्टोरी…

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओल 29 जून 2012 रोजी बॉलिवूडमधील बड्या स्टार्स आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत उद्योगपती भरत तख्तानी यांच्याशी विवाहबंधनात अडकली. लग्नाआधी देखील दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही…

ईशा देओल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.