पराक्रमाचे पोवाडे गाणारं गीत रसिकांचा अभिमान जागवणार, ‘फास’मधील गाण्यात छत्रपतींचा जयघोष घुमणार!

आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धनीतीच्या अभ्यासक्रमात आजही ज्यांची रणनीती अभ्यासली जाते ते छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसांच्या हृदयात कायमचे अजरामर झाले आहेत. 'फास' या आगामी सामाजिक मराठी चित्रपटातही शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारं गीत रसिकांचा अभिमान जागवणार आहे.

पराक्रमाचे पोवाडे गाणारं गीत रसिकांचा अभिमान जागवणार, ‘फास'मधील गाण्यात छत्रपतींचा जयघोष घुमणार!
Faas Marathi Movie
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 1:02 PM

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारसरणीचा महाराष्ट्रातील प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धनीतीच्या अभ्यासक्रमात आजही ज्यांची रणनीती अभ्यासली जाते ते छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसांच्या हृदयात कायमचे अजरामर झाले आहेत. ‘फास’ या आगामी सामाजिक मराठी चित्रपटातही शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारं गीत रसिकांचा अभिमान जागवणार आहे.

माँ एंटरटेनमेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकत समाजातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘फास’ची निर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड यांनी मिळून केली आहे. ‘फास’मधील एक धडाकेबाज आणि अतिशय महत्त्वाचं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या गाण्याचा ‘फास’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

‘जी जी रं जी जी…’ असं म्हणत सुरू होणारं हे गाणं शिवजन्माचं वर्णन करणारं आहे. हे गाणं गीतकार अमोल देशमुख यांनी लिहिलं असून, संगीतकार अॅलन के. पी. यांनी अवधूत गुप्ते आणि शेख निशांत या गायकांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत केलं आहे. ‘शिवनेरीवर शिवशक्तीचं तेज जन्मलं आज…’ असा या गाण्याचा मुखडा ऐकता क्षणीच स्मरणात राहणारा आहे. या गाण्यात महाराजांचा भगवा डौलानं फडकताना दिसतोच, पण शिवरायांची सुंदर मूर्तीही लक्ष वेधून घेते.

कमलेश सावंत, उपेंद्र लिमये झळकणार गाण्यात!

कमलेश सावंत या प्रमुख कलाकारावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. गाण्याच्या सुरुवातीला खाकी वर्दीत राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता उपेंद्र लिमयेही दिसतो. त्यानंतर गाणं सुरू होतं. ढोल-ताशांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गाणारं हे गाणं चित्रीत आणि ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. यासाठी बऱ्याच ज्युनियर कलाकारांसोबत ढोल-ताशा पथकाचाही समावेश करण्यात आला आहे. शिस्तबद्ध ढोल वादन आणि तालबद्ध नर्तनाची झलक या गाण्यात पहायला मिळते. ढोल-ताशांच्या जोडीला अस्सल मराठमोळं लेझीम नृत्यही यात आहे. या जोडीला तलवारबाजी, दांडपट्टा या साहसी खेळांसोबतच महाराष्ट्राची ओळख असलेली फुगडीही यात दिसते. एकूणच हे गाणं कथानकात महत्त्वाच्या क्षणी येणारं असून, त्यानंतर काय घडतं याबाबत कुतूहल जागवणारं आहे.

130पेक्षा अधिक पुरस्कार पटकावणारा ‘फास’!

अविनाश कोलते यांनी ‘फास’चं दिग्दर्शन केलं आहे. यात उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी केलं आहे, तर दिग्दर्शन करणाऱ्या अविनाश कोलते यांनीच पटकथालेखनही केलं आहे.

जगभरातील परीक्षक आणि जाणकार रसिकांची कौतुकाची थाप मिळवत 130पेक्षा अधिक पुरस्कार पटकावणारा ‘फास’ 4 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शेतकरी आणि त्यांच्या जीवनशैलीकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा ठरणार आहे. सातत्यानं वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणाऱ्या परिणामावर आधारलेली कथा ‘फास’मध्ये पहायला मिळणार आहे. कानसह जापान आणि पॅरिस या परदेशांसोबतच राजस्थान व नोएडा या महत्त्वाच्या शहरांमधील सिनेमहोत्सवांमध्ये ‘फास’चं खूप कौतुक करण्यात आलं आहे. रमणी रंजन दास या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत, तर अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे हे संकलक आहेत. कला दिग्दर्शनाची बाजू संतोष समुद्रे यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा :

‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!

सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?

मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?

Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.