Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांनी लग्न का केलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो! त्याचंच ‘हे’ उत्तर

| Updated on: Feb 06, 2022 | 4:59 PM

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आपल्या सुमधूर आवाजाने आजवर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत त्यांनी अनेक गाणी अजरामर केली.

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांनी लग्न का केलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो! त्याचंच हे उत्तर
लता मंगेशकर
Follow us on

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आपल्या सुमधूर आवाजाने आजवर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत त्यांनी अनेक गाणी अजरामर केली. लतादिदींच्या करिअरचा ज्या-ज्या वेळी विषय निघतो, त्यावेळी त्यांच्या लग्नाचा विषय देखील निघतो. एवढी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना लतादीदींनी लग्न का केलं नसावं? लग्न न करण्यामागे काही खास कारण असावं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांचं लग्न न करण्याचं कारण त्यांची कुटुंबियांप्रति निष्ठा दाखवते. भाऊ-बहिणींमुळे आपण लग्न न केल्याचं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं.

लतीदिदी लग्नाचा विचार करायच्या पण तो कधीच अमलात आला नाही…!

एवढ्या मोठ्या संगीत कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी लग्न का केले नाही, याची बरीच चर्चा होते. एकदा हाच प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारला गेला. त्यावर त्या म्हणाल्या, आमच्या वडीलांचं आम्ही खूप लहान असतानात निधन झालं होतं. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांची जबाबदारी माझ्यावर आली. अशा परिस्थितीत मी लग्नाचा अनेकवेळा विचार करूनही तो विचार अमलात आणू शकला नाही. तो विचार केवळ विचारच राहिला. मी अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. वाटलं आधी सगळ्या लहान भावंडांना शिक्षण द्यावं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करावं. त्यानंतर बहिणींची लग्न झाली. त्यांना मुलं गेली. त्यामुळे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी होती. असाच वेळ जात होता. त्यानंतर माझ्या लग्नाचा विचार मागे पडला. मी त्यांच्यातच गुंतून गेले.

लतादिदी राजघराण्याच्या सुनबाई झाल्या असत्या, पण…!

त्यांच्या लग्नाबाबत त्यावेळच्या मीडियामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण खऱ्या बातम्या काही वेगळ्याच होत्या. वास्तविक राजस्थानच्या डुंगरपूर राजघराण्यातील राज सिंह डुंगरपूर यांची लता मंगेशकर यांच्याशी मैत्री होती. खरं तर राज सिंहची लता दिदींच्या भावाशी मैत्री होती, ते दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे. राज सिंह शिक्षणासाठी मुंबईला आले होते, तिथे त्यांची लता मंगेशकरांशी भेट झाली. राज सिंह अनेकदा लतादीदींच्या भावाला त्यांच्या घरी भेटायला जायचे.

कालांतराने त्यांची लता मंगेशकर यांच्याशी मैत्री झाली. मात्र, दोघांचे लग्न होऊ शकले नाही. यामागचे कारण म्हणजे राज सिंह यांनी वडिलांना दिलेलं वचन होतं. ज्यामध्ये त्यांनी कोणत्याही सामान्य मुलीला राजघराण्याची सून बनवू नका असं म्हटलं होतं. यामुळे त्यांनी लग्न केले नाही. कदाचित हेच कारण असेल की दोघांनीही आयुष्यभर इतर कोणाशीही लग्न केले नाही, तरीही ते दोघे शेवटपर्यंत मित्र राहिले.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar : फोटोग्राफर लता मंगेशकर आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, ‘असं’ होतं बहीणभावाचं नातं

युगप्रवर्तक गायिका म्हणून 1978 मध्येच बहाल केली होती डीलिट पदवी, शिवाजी विद्यापीठाने म्हटले होते जगावर लतादीदींच्या सुरांचे साम्राज्य

Lata Langeshakar : बालपणीची हेमा ते भारतरत्न लता मंगेशकर, पहा दिदींचे कधीही न पाहिलेले फोटो