AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेताची मुलगी पलक तिवारी या अभिनेत्याच्या मुलाला करतेय डेट, मालदीवमध्ये एकत्र?

श्वेता तिवारीची लाडकी मुलगी पलक तिवारी एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांनीही यावर कधीही भाष्य केले नाही. त्यांनी आपली प्रेम कहाणी लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते जगासमोर आली आहे. बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून बातम्या येत आहेत की कपल कोणाला डेट करत असल्याचं मान्य करत नसली तरी नुकत्याच व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून ते एकमेकांच्या खूप जवळ असल्याची कल्पना चाहत्यांना आली आहे.

श्वेताची मुलगी पलक तिवारी या अभिनेत्याच्या मुलाला करतेय डेट, मालदीवमध्ये एकत्र?
| Updated on: Nov 16, 2024 | 5:51 PM
Share

प्रेम कितीही लपवलं तरी एक दिवस बाहेर येतंच. श्वेता तिवारी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यमामुळे नेहमीच चर्चेत असते. पण आता तिची मुलगी पलक तिवारी देखील चर्चेत आहे. कारण ती एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला डेट करतेय. हो तो अभिनेता दुसरा कोणी नसून सैफ अली खान आहे. पलक ही इब्राहिम अली खानला डेट करत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारी आणि इब्राहिम एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत होत्या. कारण दोघांना अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलंय. पण दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही वक्तव्य केले नाही.

बरेच काही लपवण्याचा प्रयत्न केला तरी दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्यांच्या फोटोंवरून चाहत्यांना याची कल्पना आली आहे.

पलक-इब्राहिम मालदीवमध्ये एकत्र?

आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहणारा इब्राहिम अली खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. सध्या तो अभिनेत्री पलक तिवारीसोबत मालदीव दौऱ्यावर आहे. दोघेही मालदीवमध्ये व्हेकेशन साजरे करत आहेत. दोघेही एकत्र क्वालिटी टाइम घालवत आहेत, हे युजर्सनी त्यांच्या फोटोंमध्ये टिपलंय.

काल पलक तिवारीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती समुद्रकिनाऱ्याजवळ बसून सेल्फी घेत होती, तर दुसऱ्या फोटोत ती काळ्या रंगाची बिकिनी घालून डोक्यावर कॅप घातलेली दिसत होती. याशिवाय दुसऱ्या एका फोटोत ती बीचवर बसलेली आहे.

View this post on Instagram

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

अभिनेत्रीने स्कूबा डायव्हिंग करताना एक फोटो शेअर केला आहे. पलकने फोटो शेअर केल्यानंतर काही तासांनंतर इब्राहिम अली खानने मालदीव ट्रिपचा एक फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये तो त्याच ठिकाणी फोटो काढताना दिसत होता, जिथून पलकनेही फोटो शेअर केले होते.

दोघांचे मालदीवमध्ये एकाच वेळी फोटो पाहिल्यानंतर युजर्सना अंदाज आला की ते दोघे एकत्र सुट्टी घालवत आहेत. एका यूजरने लिहिले की, इब्राहिम आणि पलक आपले प्रेम लपवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

दुसऱ्या यूजरने लिहिले की, “फोटोवरून स्पष्टपणे दिसत आहे की तो फक्त पलकसोबत आहे”. दुसऱ्या यूजरने लिहिले की, “पलक आणि इब्राहिम त्यांच्या डेटिंगचा वर्धापनदिन साजरा करत आहेत”.

;

पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, तर इब्राहिम अली खान करण जोहरच्या प्रोडक्शनच्या ‘सरजमीन’मधून पदार्पण करणार आहे, ज्यामध्ये तो दिसणार आहे. यात मुख्य भूमिकेत खुशी कपूर दिसणार आहे.

सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.