Bigg Boss 15 : शमिता शेट्टी बनली बिग बॉस 15 ची नवीन कॅप्टन, VIP नसलेल्या स्पर्धकांचेच घरामध्ये वर्चस्व!

बिग बॉस 15  (Bigg Boss 15) च्या रिअॅलिटी शोमध्ये आज झालेल्या 'कॅप्टनसी' (Captaincy Task) टास्कमध्ये शमिता शेट्टीला (Shamita Shetty) पुन्हा एकदा कॅप्टन बनवण्यात आले. सध्या या शोमध्ये करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, राखी सावंत, शमिता शेट्टी 'तिकीट टू फिनाले' तसेच व्हीआयपी स्टार्स आहेत.

Bigg Boss 15 : शमिता शेट्टी बनली बिग बॉस 15 ची नवीन कॅप्टन, VIP नसलेल्या स्पर्धकांचेच घरामध्ये वर्चस्व!
शमिता शेट्टी

मुंबई : बिग बॉस 15  (Bigg Boss 15) च्या रिअॅलिटी शोमध्ये झालेल्या ‘कॅप्टनसी’ (Captaincy Task) टास्कमध्ये शमिता शेट्टीला (Shamita Shetty) पुन्हा एकदा कॅप्टन बनवण्यात आले. सध्या या शोमध्ये करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, राखी सावंत, शमिता शेट्टी ‘तिकीट टू फिनाले’ तसेच व्हीआयपी स्टार्स आहेत. पण या कॅप्टन्सी टास्कमध्ये बिग बॉसने या 4 VIP पैकी कोणत्याही एकाला कॅप्टन बनण्याचा अधिकार VIP नसलेल्या स्पर्धकांच्या हाती दिला होता.

सध्या VIP नसलेल्या स्पर्धकांमध्ये निशांत भट, प्रतीक सहजपाल, रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्य आणि अभिजीत बिचुकले यांचा समावेश आहे. काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये रश्मी देसाई आणि अभिजित बिचुकले यांचा ‘तिकीट टू फिनाले’ टास्क घेतला. कॅप्टनसी टास्कमध्ये बिग बॉसने सांगितले की, VIP नसलेल्या स्पर्धकांना झोम्बी बनावे लागेल जेव्हा बजर वाजेल तेंव्हा VIP नसलेल्या स्पर्धकाने VIP असलेल्या स्पर्धकाच्या नावावर हातोडा मारत राहून त्याला कॅप्टनसी टास्कमधून बाहेर काढायचे आहे.

VIP सदस्य असलेली एक म्हणजे शमिता शेट्टीला कॅप्टनसी टास्कमधून बाहेर काढण्यासाठी अभिजीत बिचुकलेने एक प्लन तयार केला होता. याबद्दल त्याने करण आणि तेजस्वीसोबत चर्चा देखील केली होती. मात्र, घरातील इतर सदस्यांनी अभिजीत बिचुकलेला संधीच दिली नाही. तसेच अभिजीत बिचुकलेने दोन वेळा टास्क रद्द करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतू काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर शेवटी शमिता शेट्टीच बिग बाॅसच्या घराची नवीन कॅप्टन झाली.

संबंधित बातम्या : 

अभिनेत्री जान्हवी कपूर कोरोनातून मुक्त, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती

‘बाप तसा बेटा, नसीरुद्दीन शहांच्या मुलाच्या बाबतीत खोटं’, 20 व्या वर्षी करिअरला सुरुवात होऊनही अपयशी!


Published On - 9:45 am, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI