महाराष्ट्रातील पहिलं कोळीगीत विठ्ठल उमप यांनी गायलं हे माहीत आहे का?; कधी आणि कोणतं? वाचा!

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 13, 2021 | 1:03 PM

लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी कव्वाली आणि लोकसंगीत एकत्रित गायनाचा नवा प्रकार लोकसंगीतात रुढ केला. (vitthal umap sings first koligeet in maharashtra)

महाराष्ट्रातील पहिलं कोळीगीत विठ्ठल उमप यांनी गायलं हे माहीत आहे का?; कधी आणि कोणतं? वाचा!
लोकशाहीर विठ्ठल उमप

मुंबई: लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी कव्वाली आणि लोकसंगीत एकत्रित गायनाचा नवा प्रकार लोकसंगीतात रुढ केला. बरं दादा एवढंच करून थांबले नाहीत, तर देशातील पहिलं कोळीगीत सुद्धा त्यांनी गायलं. ते कोळीगीतांचे जनक आहेत. दादांनी कोळीगीत गायल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर कोळीगीतं गायली जाऊ लागली. विशेष म्हणजे त्यांनी गायलेल्या पहिल्या कोळीगीताची रॉयल्टीही त्यांना मृत्यूपर्यंत मिळत होती. त्या गीताचा दादांनीच सांगितलेला हा किस्सा… (vitthal umap sings first koligeet in maharashtra)

‘फाटकी नोट…’ अशी खणखणीत चालली

विठ्ठल उमप यांनी खऱ्या अर्थाने कोळीगीतांची मुहुर्तमेढ रोवली. 1962 मध्ये गीतकार, कवी, शाहीर, दिवंगत कुंदन कांबळे यांनी ‘फाटकी नोट मना घ्यावाची नाय, धंद्यात खोट मना खावाची नाय’ हे गीत लिहिलं. हे गाणं विठ्ठल दादांनी गायलं आणि ते तुफान गाजलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहेत. गाण्याचे शब्द, संगीत आणि विठ्ठलदादांच्या लाजवाब आवाजाने हे गाणं मराठी माणसाच्या मनावर आजही गारूड करून आहे. एवढेच नव्हे तर 19962 मध्ये आलेल्या या गाण्याची विठ्ठलदादांना अखेरपर्यंत रॉयल्टी मिळत होती. यावरून या गाण्याची लोकप्रियता दिसून येते.

कुंदनदादा मासळी बाजारात गेले आणि…

या गाण्याचा किस्साही वेगळाच आहे. शाहीर कुंदन कांबळे हे एकदा मासळी बाजारात गेले होते. तिथला गजबाजाट, म्हावरं विकताना मासळी विक्रेत्या मावश्यांचा कोळीबोलीतून चाललेला संवाद, कुंदनदादांच्या कानावर आला. हे सर्व वातावरण पाहून त्यांना गाणं सूचलं नसतं तर ते कुंदनदादा कसले? हे वातावरण पाहून त्यांना ‘फाटकी नोट…’ सूचलं आणि महाराष्ट्राला पहिलं कोळीगीत मिळालं.

गाणं, नाटक, मालिका, सिनेमा ते पुस्तक लेखन

विठ्ठलदादा खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी केवळ गाणीच गायली नाही किंवा ते केवळ गायक, शाहीरच नव्हते. तर त्यांनी नाटक लिहिलं आणि नाटकांमध्ये कामही केलं. टीव्ही मालिका, सिनेमांमधूनही त्यांनी अभिनय केला आणि पुस्तकांचं लेखनही केलं. ‘भारत एक खोज’, ‘महापर्व’, ‘पाऊस मृगाचा पडतो’, ‘सागर की गोद में’ आणि ‘कोंडामार’ आदी मालिकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. ‘अबक दुबक तिबक’, ‘खंडोबाचं लगीन’, ‘अरे संसार संसार’, ‘जांभूळ आख्यान’, ‘गाढवाचं लग्न’, ‘दार उघड बया दार उघड’, ‘बुद्ध सरणं’, ‘विठो रुखमाई’ या नाटकांतून आणि ‘आहेर’, ‘पायगुण’, ‘देवता’, ‘अन्यायाचा प्रतिकार’, ‘भीमगर्जना’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘जन्मठेप’, ‘बळीचं राज्य येऊ दे’ आणि ‘बघ हात दाखवून’ आदी सिनेमातून त्यांनी अभिनय केला. त्यांचं ‘फू बाई फू’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ‘उमाळा’, ‘गीत पुष्पांजली’, ‘माझी वाणी, भीमा चरणी’, ‘माझी आई भीमाई’, ‘रंग शाहिरीचे’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ती गीते लोकगीते नाहीत

विठ्ठल दादांना डबल मिनिंगच्या गीतांची प्रचंड चीड होती. लोकगीतांच्या नावाखाली बिभत्स गीतांचा बाजार भरत असल्याबद्दल ते तीव्र नाराजी व्यक्त करत. दादांच्या भाषेतच सांगायचे म्हणजे अचकट-विचकट गीते म्हणजे लोकगीते नव्हेतच. दादांनी या डबल मिनिंगच्या गीतांविरोधात मोठी मोहीम पुकारली होती. जिथे जिथे त्यांचा जलसा व्हायचा तिथेतिथे ते डबल मिनिंगच्या गीतांविरोधात प्रबोधन करायचे. या गीतांविरोधात प्रबोधन केल्यानंतरच त्यांचा मुख्य कार्यक्रम सुरू व्हायचा. (साभार, आंबेडकरी कलावंत) (vitthal umap sings first koligeet in maharashtra)

संबंधित बातम्या:

विठ्ठल उमप यांचा आवाज ऐकून मन्ना डे काय म्हणाले?; वाचा, लोकशाहीराचा किस्सा!

रेल्वे आणि बस प्रवासातही रियाज करायचे; लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे हे किस्से माहीत आहेत काय?

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

(vitthal umap sings first koligeet in maharashtra)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI