
जगभरात जीवंत माणसाला खाणाऱ्या अळीने खळबळ माजवली आहे. मेक्सिकोत या अळीच्या दंशाचे पाच हजाराहून अधिक केस नोंदल्या गेल्या असून तीन डझन माणसांना तिचा दंश झाल्याचे उघड झाले आहे. एनपीआर न्यूजच्यामते अमेरिकेत पहिल्यांदा माणसाचे मांस खाणारा हा परजीवी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. माणसाचा मांस खाणारा हा पॅरासाईट नेमका काय आहे आणि हा जीवंत माणसे आणि जनावरांचे मांस कसे खातो या संदर्भात माहिती घेऊयात..
या परजीवी अळीचे नाव स्क्रुवॉर्म ठेवण्यात आले आहे. ही अळी स्क्रु सारखी एखादा माणूस किंवा जनावराच्या जखमेतून शरीरात घुसते. या परजीवीचा आकार स्क्रु सारखा असल्यानेच त्याचे नाव स्क्रुवॉर्म ठेवले आहे.अमेरिकेत पहिल्यांदा एका माणसाला हीने दंश केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या परजीवी दक्षिण अमेरिकेतून उत्तर अमेरिकेत पसरला आहे. या अळीने अमेरिकेच्या पशू उद्योगात चिंतेचे सावट पसरले आहे.
या अळीच्या सर्वाधिक केस मेक्सिकोत दाखल झाल्या आहेत. माणूस आणि जनावरांत एकूण ५,०८६ केस मिळाल्या आहेत. त्यातील ४१ केस माणसात सापडल्या आहेत. तर इतर केस जनावरांमध्ये सापडले आहेत. यात गायी, कुत्रे, घोडे आणि अन्य जनावरांचा समावेश आहे.तसेच युएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशनने ( सीडीसी ) मॅरीलँड आरोग्य विभागाच्या मदतीने ४ ऑगस्ट रोजी अमेरिकेत या केसेस असल्याची कबूली दिली आहे. हा स्क्रु वॉर्म एका अशा रुग्णात सापडला जो एल सल्वाडोरहून प्रवास करुन आला होता. आरोग्य आणि मानव सेवा विभागाचे प्रवक्ता एंड्र्यु निक्सन यांनी एनपीआरला ही माहिती दिली आहे.
सीडीसीच्या मते न्यू स्क्रुवॉर्म एक प्रकारची परजीवी माशी असून जी सामान्यत: दक्षिण अमेरिका आणि कॅरीबियन क्षेत्रात आढळते. याची मादी आपली अंडी जीवंत जनावरांच्या जखमेत किंवा शरीराच्या खुल्या भागात देते. अंड्यातून निघालेल्या लार्वा ( अळ्या ) जनावराचे मांस जीवंत अवस्थेत खातात आणि संक्रमित करतात. मानवी प्रकरणात हे संक्रमण दुर्लभ आहे.परंतू त्यामुळे अत्यंत तीव्र वेदना होत असून उपचार न झाल्यास प्राणावरही बेतते.
जर संक्रमणाची सुरुवात सुरु झाली तर माशा अंडी देणे सुरु करतात आणि तिच्या अळ्या मेंदू ते कोणत्याही संवेदनशील अवयवात शिरु शकतात. ज्यामुळे सेप्सिस ( रक्त संक्रमण ) सारख्या गंभीर स्थिती निर्माण होतात असे उत्तर कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मॅक्स स्कॉट यांनी सांगितले. परंतू हा व्हायरल नसल्याने याचे एका पासून दुसऱ्यास संक्रमण होत नाही.
गेल्या वर्षी मेक्सिकोतील एक पशु फार्ममध्ये या स्क्रुवॉर्मची केस उघडकीस आली. आता अमेरिका-मेक्सिको सीमेपर्यंत याचा प्रादुर्भाव वाढला आहे. या धोक्याला पाहून अमेरिकन सरकारने अनेक नवी पावले उचलली आहेत. २०२५ मध्ये USDA ने या परजीवीचा निपटारा करण्यासाठी टेक्सासच्या एडिनबर्गमध्ये अमेरिकेतला हा पहिला स्टेराईल फ्लाय प्रोडक्शन फॅसिलिटी तयार करण्याची योजना आखली आहे. आता दर आठवड्यांना ३० कोटी नपंसुक नर माशा तयार केले जाणार असून त्या हवेत सोडल्या जाणार आहेत. रेडीएशनने त्यांना नपंसुक बनवले जाणार आहे.मादी माशीशी संपर्क आल्यानंतर त्या अंडे देऊ शकणार नाहीत. अशा प्रकारे त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवले जाणार आहे. अमेरिकेने १९६६ मध्ये अशाच प्रकारे या माशीला संपवले होते. त्यानंतर २०१७ मध्येही पुन्हा झालेल्या प्रकोपानंतर हाच पर्याय वापरला होता.