Russia-ukrain War: यूक्रेन हल्ल्याने हडबडलेल्या पुतीन यांचा ‘आण्विक संताप’, ‘Satan-2’ क्षेपणास्र तैनात करण्याची तयारी

युक्रेनने 40 हून अधिक लढाऊ विमानांचा अक्षरश: कोळसा केल्याने रशियाने एका जबरदस्त हल्ल्याची तयारी केली आहे. या आता ही वेळ पारंपारिक शस्रास्रांपर्यंत ही बाब मर्यादित राहणार नाही.या हल्ल्याला आता रशिया काय प्रत्युत्तर दिले जाते याकडे जगाचे लक्ष लागले असतानाच रशियाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

Russia-ukrain War: यूक्रेन हल्ल्याने हडबडलेल्या पुतीन यांचा आण्विक संताप, Satan-2 क्षेपणास्र तैनात करण्याची तयारी
Breaking News
| Edited By: | Updated on: Jun 02, 2025 | 6:27 PM

रशिया आणि यूक्रेन यांचे युद्ध जवळपासून दोन – अडीच वर्षे सुरुच आहे. गुड फ्रायडे निमित्ताने सुरु असलेली सिजफायर संपल्यानंतर रशियाने दोनदा युक्रेनवर हल्ले केले. यावेळी रशियाने रहिवासी विभागात हल्ले केले होते. याचा बदला अखेर युक्रेनने घेतला आहे. युक्रेनने रशियाच्या 4,000 किलोमीटर आत घुसून साहसी ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या या हल्ल्यात रशियाच्या 40 हून अधिक लढाऊ विमानांचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या हल्ल्याने क्रेमलिनमध्ये खळबळ उडाली आहे. रशियाच्या एकूण पाच विमानतळांवर भीषण ड्रोन अॅटॅक झाल्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अक्षरश: हडबडले आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.