
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारताबद्दल धक्कादायक अशी निर्णय घेताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी टॅरिफनंतर आता H-1B व्हिसाबद्दल अत्यंत हैराण करणारा असा निर्णय घेतला आहे. त्यांनी H-1B व्हिसावर मोठे शुल्क आकारले आहे. अमेरिकेत अनेक भारतीय नागरिक नोकऱ्या करण्यासाठी जातात आणि ते सर्वजण याच H-1B व्हिसावर जातात. हेच नाही तर ज्या टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत बोलावतात, ते देखील याच व्हिसावर जातात. आता हा व्हिसा मिळवणे पूर्वीसारखे सोप्पे नाहीये. आता नव्या नियमाप्रमाणे जर तुम्हाला या व्हिसा पाहिजे असेल तर तब्बल 88 लाख रूपये फीस ही भरावी लागणार आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय व्यावसायिकही अडचणीत आले.
भारताला कोंडीत पकडण्यासाठी हा नवा डाव डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलाय. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसाचा हा कट जास्त दिवस टिकू शकणार नाही आणि त्याची हवा लवकरच जाईल, असे तज्ज्ञांची स्पष्ट मत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे टेक कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण टेक कंपन्या या भारत आणि इतर देशातील कर्मचाऱ्यांना H-1B व्हिसातूनच अमेरिकेत नोकऱ्या देतात. अमेरिकेतील टेक कंपन्या H-1B व्हिसाच्या नव्या नियमाच्या विरोधात कोर्टात जाण्याची शक्यता आह.
तज्ज्ञांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसाची नवीन अट ही कोर्टात टीकणार नाही. तिथे या नव्या नियमाची हवा निघेल. कायदेशीर लढाई ट्रम्प यांच्या विरोधात लढण्याची तयारी अनेक कंपन्यांनी केली आहे. कारण ट्रम्प यांच्या या नवीन नियमामुळे मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. फक्त हेच नाही तर त्यांना इतर देशातून चांगले कामगार अमेरिकेत आणण्यासाठी मोठा पैसा देखील मोजावा लागेल.
मुळात म्हणजे H-1B व्हिसा धारक अमेरिकेत सर्वाधिक भारतीय लोक आहेत. अमेरिकेतील आयटी कंपन्यांमध्ये भारतीय लोक मोठ्या संख्येने नोकऱ्या करतात. त्यांना सध्यातरी या नियमाचा सर्वाधिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे. H-1B व्हिसाच्या माध्यमातून भारताविरोधात मोठा कट डोनाल्ड ट्रम्प यांनी रचला. त्यांना काहीही करून भारताला अडचणीत आणायचे असल्याचे स्पष्ट आहे.