पार्थ आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने : चंद्रकांत पाटील

पार्थ आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास 'सत्यमेव जयते'च्या दिशने : चंद्रकांत पाटील

पार्थ पवार आतल्या आवाजाला जास्त महत्त्व देतात असं सांगताना पार्थ यांच्या भाजप प्रवेशाचा अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. (Chandrakant Patil On parth pawar On His maratha Reservation Tweet)

Akshay Adhav

|

Oct 01, 2020 | 7:57 PM

पुणे : पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणावर केलेल्या ट्विटमुळे आज ते पुन्हा चर्चेत आले. राज्य सरकारने याप्रश्नी लक्ष घातलं पाहिजे, असं मागणी त्यांनी केली. पार्थ यांच्या याच भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, पार्थ पवार आतल्या आवाजाला जास्त महत्त्व देतात असं सांगताना पार्थ यांच्या भाजप प्रवेशाचा अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. (Chandrakant Patil On parth pawar On His maratha Reservation Tweet)

चंद्रकांत पाटील म्हणाले, “पार्थ त्यांच्यातल्या आतल्या आवाजाला जास्त महत्त्व देतात. त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने सुरु आहे. मात्र याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव अजून आला नाही”.

मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर चांगलीच तोफ डागली. मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्र सरकार काढू शकत नाही. आरक्षण हा राज्याच्या अखत्यारितील विषय आहे. इतकी वर्ष राजकारणात घालवलेल्या पवारांना हे माहिती नाही की काय?,  असं पाटील म्हणाले.

तत्पूर्वी मराठा आरक्षणासाठी बीड येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी जाहीर केलंय. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यात अपयश आल्याची टीका राज्य सरकारवर होत असतानाच पार्थ यांनी ही भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पार्थ पवार यांनी विवेक रहाडेचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत “विवेकनं आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचं भवितव्य अंधकारमय झालं आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही,” असं पार्थ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून माझ्या मनातील मराठा आरक्षणाची पेटलेली मशाल पुढे नेण्यास मी तयार आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी विवेकनं आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा घटना घडण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारनंही यात तातडीनं लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणीही पार्थ यांनी केली.

Chandrakant Patil On parth pawar On His maratha Reservation Tweet

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक, आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें