
आपण प्रत्येकजण ऑफिसला व कोणत्याही कार्यक्रमात जाताना परफ्यूम किंवा डिओडोरंट लावत असतो. तसेच खास करून उन्हाळ्यात शरीराला घाम आणि वास येऊ नये म्हणून प्रत्येकजण डिओडोरंट किंवा परफ्यूम वापरतो. त्यातच आपल्यापैकी असे बरेच लोकं आहेत ज्यांना या दोन्ही गोष्टी एकसारखेच वाटतात. त्यामुळे यांचा वापर सारख्या पद्धतीने करतात. परंतु प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टीमध्ये मोठा फरक आहे. तर डीओ घामातून येणारा वास कमी करतो. डिओडोरंट थेट शरीरावर, विशेषतः अंडरआर्म्सवर लावले जाते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते. दुसरीकडे परफ्यूम फक्त चांगल्या वासासाठी त्याचा वापर करतात. कपड्यांवर किंवा मनगट किंवा मान यासारख्या शरीराच्या विशेष भागांवर लावले जाते.
परफ्यूमचा सुगंध तीव्र असतो आणि बराच काळ टिकतो. पण यामुळे घामाचा वास लपत नाही. सोप्या शब्दांत सांगायचे तर, डीओच्या वापराने घामाचा वास निघून जातो आणि परफ्यूम सुगंध वाढवतो. म्हणून गरजेनुसार दोन्ही वापरणे योग्य आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर डिओडोरंट लावा आणि जर तुम्हाला फक्त सुगंध हवा असेल तर परफ्यूम निवडा. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला डिओडोरंट आणि परफ्यूममधील फरक सांगणार आहोत. चला सविस्तर जाणून घेऊयात –
डिओडोरंट म्हणजे काय?
डिओडोरंट हे एक सुगंधित बॉडी प्रोडक्ट आहे जे शरीरातील घामाचा वास दूर करण्यासाठी वापरले जाते. हे प्रोडक्ट शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर जसे की अंडरआर्म्स, मान, आणि पोटावर लावले जाते.
परफ्यूम म्हणजे काय?
परफ्यूमचा सुगंध बराच काळ टिकतो. कपड्यांमधून येणारा दुर्गंधी दूर करण्यास ते मदत करते. त्यामुळे परफ्यूम हा कपड्यांवर वापरला जातो.
डिओडोरंट आणि परफ्यूममधील सर्वात मोठा फरक म्हणजे परफ्यूम एसेन्स. परफ्यूममध्ये परफ्यूम एसेन्स 25% असते तर डिओडोरंटमध्ये परफ्यूम एसेन्स फक्त 2% पर्यंत असते.
परफ्यूम हा डिओडोरंटपेक्षा कडक असतो. त्याचा सुगंधही दीर्घकाळ टिकतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर, त्याचा सुगंध 12 ते 15 तास टिकतो. दुसरीकडे, डिओडोरंटचा सुगंध 4 तासांपेक्षा जास्त काळ टिकत नाही.
परफ्यूम शरीरातील घामाचा वास काढून टाकतो. तर डिओडोरंट शरीरातील घाम शोषून घेतो. त्यामुळे तुम्हाला बराच काळ ताजेतवाने वाटते.
या दोन्हींच्या किमतीत मोठा फरक आहे. डिओडोरंटची किंमत खूपच कमी आहे तर परफ्यूम खूप महाग आहेत.
डिओडोरंट स्प्रे किंवा स्टिकच्या मदतीने लावला जातो, तर परफ्यूम फक्त स्प्रेच्या मदतीने लावता येतो.
डिओडोरंटमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 10 ते 15% असते तर परफ्यूममध्ये ते 15 ते 25% असते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)