AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता
| Updated on: Jan 17, 2025 | 9:38 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सैफ अली खानच्या घरात दबा धरून बसलेल्या एका व्यक्तीनं त्याच्यावर हल्ला केला. मात्र अजूनही पोलिसांना या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाहीये, आरोपी अद्यापही मोकाट आहे. त्यामुळे आता पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.पोलीस तपास सुरू असतानाच आणखी एक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे जेव्हा या व्यक्तीनं सैफवर हल्ला केल्या त्यानंतर आपण पकडले जाऊ नये यासाठी या व्यक्तीनं आपले कपडे बदलले होते.

सैफचं घर आणि वाद्रा येथील लकी हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून असं समोर येत आहे की, आरोपीने हल्ल्यानंतर आपला गेटअप बदलला होता. पोलिसांच्या 35 टीम सध्या या हल्लेखोराच्या मागावर आहेत. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीनं मध्यरात्री दोन ते अडीचदरम्यान सैफवर हल्ला केला, त्यानंतर तो सकाळी आठ वाजेपर्यंतच वांद्रा परिसरातच फिरत होता. मात्र तरी देखील पोलिसांना या आरोपीला पकडण्यात यश आलं नाही.

पोलिसांना देखील या गोष्टीमुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे की, सैफच्या घरात प्रवेश करण्यासाठी दोन एन्ट्री पॉइंट आहेत, आणि दोन्ही एन्ट्री पॉइंटवर सुरक्षा रक्षक तैनात होते मग हा हल्लेखोर घरात घुसला कसा? जेव्हा हल्लेखोरानं सैफवर हल्ला केला तेव्हा त्याने डोक्यात टोपी आणि तोंडाला मास्क लावला होता.मात्र जेव्हा तो त्या बिल्डिंगमधून बाहेर पडला तेव्हा त्याने आपली टोपी आणि मास्क काढून टाकला होता. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तब्बल चाळीस ते पन्नास लोकांची चैकशी केली आहे. एका रिपोर्टनुसार हल्लेखोर जेव्हा सैफच्या घरात घुसला तेव्हा त्याच्या पायात चप्पल नव्हती, मात्र जेव्हा तो घराच्या बाहेर पडला तेव्हा त्याने पायामध्ये चप्पल घातली होती. सध्या सैफ अली खानवर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.