AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंनी पेटारा उघडला, शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे (Aditya Thackeray Sanction 23 crore rupees for Shivneri Fort).

आदित्य ठाकरेंनी पेटारा उघडला, शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर
| Updated on: Jan 28, 2021 | 8:23 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे (Aditya Thackeray Sanction 23 crore rupees for Shivneri Fort).

“छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. यासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या निधीतून पुरातत्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनरुज्जीवन, पाथवेंची सुधारणा, रॉककट गुंफांचे पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे इको टुरीजमची कामे, अप्पर पाथवेसाठी गॅबियन वॉल, बागेसाठी लँडस्केपींगची कामे आदी विविध कामे केली जाणार आहेत.

या कामासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या कामाच्या मंजुरीसाठी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदित्य ठाकरे यांनी आभार मानले आहेत. भविष्यात शिवनेरीप्रमाणेच राज्यातील सर्व गडकिल्ल्यांचा त्यांचे ऐतिहासिक महत्त्व राखत पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल. या माध्यमातून शिवरायांचे कार्य देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक कार्य केले जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले (Aditya Thackeray Sanction 23 crore rupees for Shivneri Fort).

हेही वाचा : इक्बाल चहल मी लक्षात ठेवेन, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं’ : अजित पवार

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.