Maharashtra News LIVE Update | अकोल्यात काटेपूर्णा धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | अकोल्यात काटेपूर्णा धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

| Edited By: prajwal dhage

Oct 06, 2021 | 1:26 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 05 Oct 2021 11:08 PM (IST)

  औंध पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून आरोपी पळाला 

  सातारा: औंध पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून आरोपी पळाला

  अनिकेत तुकाराम काळे (वय 25 वर्षे रा. कळंबी ता. खटाव) असे संशयित आरोपी चे नाव

  बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी केली होती अटक

  औंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकलसाठी आणले असताना पोलिसांची नजर चुकवून आरोपीचे पलायन

  खटाव तालुक्यातील औंध परिसरात पोलिसांची शोधमोहीम

 • 05 Oct 2021 10:09 PM (IST)

  अकोल्यात काटेपूर्णा धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  अकोला : अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे रात्री 9 वाजता 4 दरवाजे 30 cm ने उघडले आहेत. यातून 102.33 घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे

 • 05 Oct 2021 08:04 PM (IST)

  नागपूरमधील कळमेश्वर येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू

  नागपूर - नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू

  दोन चुलत जावांचा झाला मृत्यू

  आज दुपारी 2 वेजदरम्यानची घटना

  मंजू पुरुषोत्तम विरुळकर वय 55 वर्ष व अलका निरंजन विरुळकर वय 42 वर्षे असे मृत महिलांचे नाव

  दोन्ही जावा घरगुती काम करत असताना त्यांना विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली

  सदर घटनेचा पुढील तपास कळमेश्वर पोलिस करीत आहे

 • 05 Oct 2021 08:02 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 162 कोरोना रुग्णांची, 167 रुग्णांना डिस्चार्ज

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 162 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

  - दिवसभरात 167 रुग्णांना डिस्चार्ज.

  - पुण्यात करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 2.

  -191 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 501790.

  - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1517.

  - एकूण मृत्यू -9040.

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 491233.

  - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6159.

 • 05 Oct 2021 06:31 PM (IST)

  बजाज फायनान्स कंपनीच्या बेकायदेशीर रिकव्हरी पद्धतीविरोधात पुण्यात रिक्षा चालकांचे निदर्शने 

  पुणे - बजाज फायनान्स कंपनीच्या बेकायदेशीर रिकव्हरी पद्धतीविरोधात रिक्षा चालकांचे निदर्शने

  - बजाजच्या वाकडेवाडी येथील शोरूमसमोर निदर्शने

  - पुणे व पिंपरी चिंचवडमधील फायनान्स कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर करवाई करण्याची मागणी

  - फायनान्स कंपन्या बेकायदेशीरपणे गुंडागर्दी करून गोरगरीब कष्टकऱ्यांकडून पैसे वसुल करत असल्याचा आरोप.

 • 05 Oct 2021 05:56 PM (IST)

  सिंधुदुर्गात ढगांच्या गडगडाटासह पाऊस, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन

  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात ढगांच्या गडगडाटासह पाऊस.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, सावंतवाडीसह अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस.

  हवामान खात्याने पुढील 3 दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस व विजा चमकण्याची शक्यता वर्तवली आहे.

  जिल्हा प्रशासनाकडून जिल्हावासीयांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन.

 • 05 Oct 2021 05:55 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यात किन्हीराजा परिसरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस 

  वाशिम : किन्हीराजा परिसरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस

  शेतकऱ्याची एकच धावपळ

 • 05 Oct 2021 05:07 PM (IST)

  लोकतांत्रिक व्यवस्था पूर्णपणे ध्वस्त झाली, विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं- संजय राऊत

  दिल्ली : प्रत्येक गोष्टी मी सांगू शकत नाही. काही गोष्टी आमच्या दोघामध्ये राहू द्या- संजय राऊत

  डेलिगेशन जाईल का? त्याबाबतही चर्चा झाली, लवकरच कळेल

  देशात लोकशाही उरली आहे का? देशात जे सुरु आहे त्यावर आम्ही चर्चा केली.

  लोकतांत्रिक व्यवस्था पूर्णपणे ध्वस्त झाली आहे.

  राजकीय चर्चा झाली, विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे.

  संजय राऊत यांची प्रतिक्रिया

 • 05 Oct 2021 04:12 PM (IST)

  सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु, हे स्वातंत्र्य आहे का- संजय राऊत

  सरकारच्या काळात आम्ही जगत आहोत. सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु आहे. हे स्वातंत्र्य आहे का

  काँग्रेसचा स्वातंत्र्यापूर्वीपासूचा इतिहास आहे.

  काँग्रेसच्या नेत्यांना एफआरआय तसेच अटक याला महत्त्व नाही.

  राजकारणात काम करायचं असेल तरे अटक म्हणजे पुरस्कार असतं.

  जी हिम्मत प्रियंका गांधी यांनी दाखवली आहे, ती विरोधकांना उर्जा देईल.

  शेतकऱ्यांना चिरडल्याच्या प्रकरणात एक व्हिडीओ आला आहे, तो खोटा आहे का- संजय राऊत

  कायदा सर्वांसाठी समान आहे, पण प्रियंका गांधी यांना अटक झाली. पण ज्या व्यक्तीमुळे ही घटना घडाली ती व्यक्ती मोकाट आहे- संजय राऊत

 • 05 Oct 2021 04:08 PM (IST)

  डोंबिवलीत धक्कादायक प्रकार, लुटीसाठी आल्यानंतर एकाचा गळा कापला 

  कल्याण : डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

  लुटीच्या इराद्याने एकाचा गळा कापला

  दुसऱ्याला मृत समजून लूटारु पसार

  रेल्वे आणि शहर पोलिकांकडून तपास सुरु

  घटनेमुळे कल्याण डोंबिवली हादरली.

 • 05 Oct 2021 04:05 PM (IST)

  साताऱ्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील काकाचा अत्याचार 

  सातारा : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील काकाने केला अत्याचार

  संशयित आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची दिली होती धमकी

  अल्पवयीन मुलगी 2 महिन्याची गरोदर

  संशयित आरोपी या प्रकरणानंतर फरार

  सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत 376 कलमान्वये गुन्हा दाखल

 • 05 Oct 2021 03:27 PM (IST)

  नाल्या जवळील बंधाऱ्यात पडल्यामुळे वडिलांसह मुलाचा मृत्यू 

  अहमदनगर : नाल्या जवळील बंधाऱ्यात पडलेल्या मुलाला वाचवताना बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू

  कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील घटना

  आज दुपारी घडलीय धक्कादायक घटना

  रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसाने ओढे नाले तुडूंब

  बंधा-याहून पाण्यातून पलीकडे जाताना घडली घटना

  मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतल्याने बापाचाही पाण्यात बुडून मृत्यू

  सचिन संजय मोरे ( वय 15 ) याला वाचवताना संजय मारूती मोरे ( वय 35 ) यांचाही मृत्यू

  कोपरगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

  नागरिकांनी दोघांचे मृतदेह शोधले

 • 05 Oct 2021 01:55 PM (IST)

  मंदिरं आणि प्रार्थनास्थळ खुली करण्यासंदर्भात पुणे महापालिकेचे आदेश जारी

  पुणे -

  - शहरातील मंदिरं आणि प्रार्थनास्थळ खुली करण्यासंदर्भात पुणे महापालिकेचे आदेश जारी,

  - शिवाय सार्वजनिक नवरात्रोत्सवासंदर्भातही पालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी,

  - कोरोना नियमांचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या अटी,

  - राज्य सरकारच्या निर्बंधाचे उलघ्नन झाल्यास कायदेशीर कारवाई करणार.

 • 05 Oct 2021 01:16 PM (IST)

  शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तरुणाचं जलसमाधी आंदोलन सुरू

  औरंगाबाद -

  शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तरुणाचं जलसमाधी आंदोलन सुरू

  औरंगाबादच्या सलीम अली सरोवरात जलसमाधी आंदोलनासाठी उतरला तरुण

  नुकसान भरपाई मिळाली नाही तर विष प्राशन करून घेणार जलसमाधी

  विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देऊन तरुणाचं आंदोलन सुरू

  दोन दिवसांच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा विष प्राशन करून घेणार जलसमाधी

  शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचं टोकाचं पाऊल

  तरुणाला बाहेर काढण्याचा प्रशासनाचे प्रयत्न सुरू

  पोलीस अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी तलावावर दाखल

  तरुणाला बाहेर येण्यासाठी पोलिसांकडून विनंती सुरू

 • 05 Oct 2021 12:50 PM (IST)

  एक रकमी एफआरपीच्या मागणीसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात आंदोलन

  सोलापूर - सोलापूरात मोठा पोलीस बंदोबस्त

  एक रकमी एफआरपीच्या मागणीसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आंदोलन

  मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली

  चार पुतळा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  अद्याप कार्यकर्ते आंदोलनस्थळी आले नाही

 • 05 Oct 2021 11:24 AM (IST)

  क्रुझवर अटक केलेल्या एका मुलाची आई पेहोचली एनसीबी ऑफिसमध्ये

  क्रुझवर अटक केलेल्या एका मुलाची आई पेहोचली एनसीबी ऑफिसमध्ये

  - नातेवाईक आरोपीसाठी जेवण आणि कपडे घेऊन आले…

  - आरोपींसाठी नातेवाईक घेऊन आले मॅकडाॅनल्डचा बर्गर…

  - पोलिसांनी अडवलं…

 • 05 Oct 2021 10:16 AM (IST)

  अतीत येथे दागिने पॉलिश करून देतो असे सांगून दागिने चोरणारी परप्रांतीय टोळी जेरबंद

  सातारा :

  अतीत येथे दागिने पॉलिश करून देतो असे सांगून दागिने चोरणारी परप्रांतीय टोळी जेरबंद..

  सचिनकुमार साह व रंजीतकुमार साह अशी गुन्हा कबूल केलेल्यांची नाव

  आरोपींकडून वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचा ऐवज आणि दुचाकी केली जप्त

  आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता

  सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिसांची कारवाई

 • 05 Oct 2021 10:16 AM (IST)

  शिक्षकांना कोरोना चाचणीचे बंधन हटवण्याचा पालिका आयुक्तांचा आदेश

  पुणे -

  - शिक्षकांना कोरोना चाचणीचे बंधन हटवण्याचा पालिका आयुक्तांचा आदेश,

  - शाळा सुरू होण्याच्या 48 तास आधी कोरोना चाचणी करणं शिक्षकांना बंधनकारक होते,

  - मात्र यामुळे शहरातील अनेक शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत,

  - त्यामुळे लसींचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांना कोरोना चाचणीचे बंधन हटवण्यात आले आहे,

  - मात्र कोरोनाचे लक्षणं दिसल्यास लगेच कोरोना चाचणी करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश.

 • 05 Oct 2021 10:15 AM (IST)

  लखीमपूर दुर्घटना ही शेतकरी, मजूर यांच्यासाठी लांच्छनास्पद आहे - संजय राऊत

  संजय राऊत-

  लखीमपूर दुर्घटना ही शेतकरी, मजूर यांच्यासाठी लांच्छनास्पद आहे

  हा एका राज्याचा विषय नाही, अन्याया साठी लढणाऱ्यांना असं केलं जातं असेल तर जगासाठी हे धोकादायक

  ही भारत पाकिस्तान लढाई आहेका ? राऊत यांचा सवाल

  अशी घटना महाराष्ट्र, केरळ, राजस्थान मध्ये झाली असती तर भाजप रस्त्यावर उतरली असती

  पण आज शेतकऱ्यांचे दुःख समजावून घ्यायला पण तिथं कुणाला जाऊ दिल जातं नाहीय

  काँग्रेस सोबत मतभेद असू शकतात, पण इंदिरा गांधी यांच्या नातीला अशी वागणूक देताय ??

 • 05 Oct 2021 09:06 AM (IST)

  राज्य सरकारने शाळा सुरू केल्या असल्या तरी पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला

  पिंपरी चिंचवड

  -राज्य सरकारने शाळा सुरू केल्या असल्या तरी पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला

  -शहरात 8 वी ते 12 मध्ये शिकणाऱ्या केवळ 5 टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी शाळेला हजेरी लावलाच समोर आलंय

  -शहरात 8 ते 12 वि मध्ये 75 हजार 848 विद्यार्थी शिकत आहेत

  -त्यातल्या 3 हजार 621 विद्यार्थ्यांनी शाळेला हजेरी लावली तर 3 हजार 621 पालकांनी संमतीपत्र दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले

 • 05 Oct 2021 09:06 AM (IST)

  पिंपरी चिंचवडमध्ये 55 नवीन रुग्णांची नोंद; 43 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

  पिंपरी चिंचवड

  - रुग्णसंख्येत मोठी घट, शहराच्या विविध भागात दिवसभरात केवळ 55 नवीन रुग्णांची नोंद; 43 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

  -शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून ही समाधानाची बाब मानली जात आहे

  -तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला

 • 05 Oct 2021 09:05 AM (IST)

  एनसीबीने अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत धक्कादाय खुलासे

  - एनसीबीने अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत धक्कादाय खुलासे…

  - ड्रग्जच्या पेडलिंगसाठी क्रिप्टो करेंसीचा वापर केल्याचा एनसीबीला संशय, सुत्रांची माहीती…

  - अनेक ड्रग्जच्या ट्रांसॅक्शनमध्ये या करंसीचा वापर केल्याचं तपासात निष्पन्न…

  - तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी या करंसीचा वापर झालाय…

  - या केसमध्ये अंतरारष्ट्रीय रॅकेट असल्याचा एनसीबीला संशय

  - आयोजक संशयाच्या भोवऱ्यात,

  - काही यात्रेकरूंनी नशेत असताना क्रूजच्या खिडक्यांचे नुकसान केल्याचं समोर, त्यांनाही ताब्यात घेतलं गेलंय…

  - आर्यनला तिथे कुणी बोलावलं याचा आत्ता एनसीबी तपास करणार….

  - त्याला ड्रग्जसाठी कुणी पैस दिले याचाही एनसीबी तपास करणार…

 • 05 Oct 2021 09:05 AM (IST)

  पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात बत्तीगुल

  - पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात बत्तीगुल,

  - शहरातील वानवडी, कात्रज, हडपसर भागात गेल्या 2 तासांपासून वीजपुरवठा खंडित,

  - वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील तारा तुटून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित,

  - वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीचे प्रयन्त सुरू

 • 05 Oct 2021 09:02 AM (IST)

  नाशिकमध्ये डेंग्यू,चिकणगुणीयाच्या रुग्णांमध्ये होतीये दिवसागणिक वाढ

  - नाशिकमध्ये डेंग्यू,चिकणगुणीयाच्या रुग्णांमध्ये होतीये दिवसागणिक वाढ

  - महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले शहरात स्वच्छता करण्याचे आदेश

  - अनेक भागात घाणीच साम्राज्य असल्याने डेंग्यूची होतीये उत्पत्ती

 • 05 Oct 2021 08:30 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात चिखलातून काढावी लागली अंत्ययात्रा

  औरंगाबाद जिल्ह्यात चिखलातून काढावी लागली अंत्ययात्रा..

  रोजगार हमी योजनेचे कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदार संघातील हा प्रकार..

  गावात रस्ता नसल्याने अक्षरशः चिखल तुडवत काढावी लागली अंत्ययात्रा..

  मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने अंत्यसंस्काराला वाट मिळणे सुद्धा होते मुश्किल..

  पैठण तालुक्यातील नवगाव-तुळजापुरातील प्रकार..

  मतदार संघात कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा रस्ता का नाही म्हणत नागरिकांचा रोष

 • 05 Oct 2021 08:29 AM (IST)

  पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे गावाच्या हद्दीत ट्रॅव्हल्स पलटी

  सातारा: पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे गावाच्या हद्दीत ट्रॅव्हल्स पलटी...

  पुणेहून कोल्हापूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात

  कंटेनरला ओव्हरटेक करताना झाला अपघात

  अपघातात ड्रायव्हर क्लिनर सह 4 प्रवासी किरकोळ जखमी

  सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला अपघात

 • 05 Oct 2021 08:16 AM (IST)

  पिंपरी चिंचवड मधील हिंजवडी पोलिसांनी एका अपहरण नाट्याचा मोठ्या शिथापीने उलगडा केलाय

  पिंपरी चिंचवड

  -पिंपरी चिंचवड मधील हिंजवडी पोलिसांनी एका अपहरण नाट्याचा मोठ्या शिथापीने उलगडा केलाय

  -हिंजवडी जवळ मारुंजी इथल्या 32 वर्षीय दिगंबर चितोडीया यांचे अपहरण झाले होते

  -त्याच्या कुटुंबीयांकडे 25 लाख रुपये खंडणी मागण्यात आली होती

  -कुटुंबियांना आलेल्या फोन नंबर च्या आधारावर पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीना अटक करत अपहरण झालेल्या दिगंबर ची सुटका केली

  -या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आलीय

 • 05 Oct 2021 07:39 AM (IST)

  पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची होणार आरोग्य तपासणी

  सोलापूर -

  पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची होणार आरोग्य तपासणी

  विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील तसेच परराज्यातील भाविकांची गर्दी होण्याची शक्यता

  विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने योग्य नियोजन करण्याचे पदाधिकाऱ्यांचे आदेश

  पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची रेल्वे स्टेशन बस स्थानक वाहनतळ या ठिकाणी संबंधित विभागाने आरोग्य तपासणी करण्याचे आदेश

  प्रांताधिकारी गजानन गुरव यांचे आदेश

 • 05 Oct 2021 07:06 AM (IST)

  पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त 214 शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा आज होणार

  पुणे

  पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त 214 शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा आज होणार

  214 जागांसाठी आलेत 39 हजार 323 अर्ज

  या परीक्षेसाठी 79 परिक्षा केंद्रावर तब्बल पावणेतीन हजार पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात

 • 05 Oct 2021 07:01 AM (IST)

  नागपुरातील बेकायदेशीरपणे वागणारे क्लब आणि संस्थांवर कारवाई केली का?, नागपुरातील बेकायदेशीरपणे वागणारे क्लब आणि संस्थांवर कारवाई केली का?

  - नागपुरातील बेकायदेशीरपणे वागणारे क्लब आणि संस्थांवर कारवाई केली का?

  - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

  - नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दोन आठवड्यात माहिती सादर करण्याचे निर्देश

  - नागपूरात ११३ संस्था आणि क्लबला सरकारी जागा लीजवर देण्यात आलीय

  - यापैकी अनेक संस्था आणि क्लब भुखंडाचा व्यावसायीक वापर करत आहेत

  - यातून क्लब, संस्था कमावतात लाखो रुपये, सरकारला काहीही मिळत नाही

 • 05 Oct 2021 07:01 AM (IST)

  पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 29 जागांसाठी आज मतदान होणार आहे

  पालघर -

  पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 29 जागांसाठी आज मतदान होणार आहे

  सकाळी साडे सहा वाजता मतदान केंद्रावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समोर मोकपॉल करण्यात आला आहे..

  5 प्रतिकात्मक मतदान टाकून मशीन सुरू आहे की नाही याची तपासणी केली आहे..

  आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात होणार आहे..

  पालघर जिल्ह्यातील 29 जागांसाठी 138 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

  बोईसर मतदार संघातील भाताने जी प केंद्र शाळेच्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी

 • 05 Oct 2021 06:58 AM (IST)

  नागपूर जिल्हा परिषद पोटणीवडणुकीसाठी 7.30 वाजता होणार मतदानाला सुरुवात

  - नागपूर जिल्हा परिषद पोटणीवडणुकीसाठी 7.30 वाजता होणार मतदानाला सुरुवात

  - जिल्ह्यातील 115 मतदान केंद्रांवर तयारी सज्ज

  - जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मतदान

  - जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात

  - पंचायत समित्यांच्या 31 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात

  - जिल्ह्यात सहा लाख 16 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

  - सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत मतदान

 • 05 Oct 2021 06:52 AM (IST)

  कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसानीचा आज केंद्रीय पथकाकडून घेतल्या जाणार आढावा

  कोल्हापूर

  कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसानीचा आज केंद्रीय पथकाकडून घेतल्या जाणार आढावा

  केंद्राच पथक आज कोल्हापूर ला येणार

  पथकात चार सदस्यांचा समावेश

  जिल्हाधिकारी कार्यालयात पथका कडून घेतला जाणार आढावा

  कोल्हापूर आणि परिसरात पथकाकडून नुकसानीच्या ठिकाणाची प्रत्यक्ष भेट मात्र नाहीत

  महापुराच्या दोन महिन्यानंतर येणार केंद्राच पथक कोणती पाहणी करणार आणि काय माहिती घेणार यावर प्रश्नचिन्ह

 • 05 Oct 2021 06:50 AM (IST)

  शिक्षकांना दर पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी करण्याची अट शिथिल

  पुणे

  शिक्षकांना दर पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी करण्याची अट शिथिल

  लसीकरणाचे दोनही डोस पूर्ण झालेले आहेत, आशांना चाचणी बंधनकारक नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केलं स्पष्ट

 • 05 Oct 2021 06:49 AM (IST)

  पुण्यात रात्री झालेल्या मुसळधार गुलटेकडी, विश्रांतवाडी, टिंगरेनगर या भागात झाडपडीच्या घटना

  पुणे

  पुण्यात रात्री झालेल्या मुसळधार गुलटेकडी, विश्रांतवाडी, टिंगरेनगर या भागात झाडपडीच्या घटना

  रात्री नऊ नंतर पावसाची उघडीप

  शहरात ढगाळ वातावरण

 • 05 Oct 2021 06:49 AM (IST)

  पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण 0.25 टक्के

  पुणे

  पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण 0.25 टक्के

  या उलट एक डोस झाल्यानंतर बाधित होणाऱ्यांचे प्रमाण हे यापेक्षा कमी

  त्यामुळे कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

 • 05 Oct 2021 06:48 AM (IST)

  तब्बल 6 तासांनी नेटकऱ्यांना दिलासा, व्हॉट्सऍप इंस्ताग्रम फेसबूक अखेर सुरू

  तब्बल 6 तासांनी नेटकऱ्यांना दिलासा

  पहाटे तीनच्या दरम्यान व्हॉट्सऍप इंस्ताग्रम फेसबूक अखेर सुरू

  सर्वर सुरू झाल्याने नेटकऱ्यांना मोठा दिलासा

  संपूर्ण जगभरात ठप्प होत सर्वर

Published On - Oct 05,2021 6:43 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें