AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur: नादच नाय करायचा… बायकोला सोडवण्यासाठी पठ्ठ्या थेट वाघाशीच भिडला, लोकं बेंबीच्या देठापासून किंचाळले… पुढे काय घडलं? चंद्रपुरातील हादरवणारी घटना

चंद्रपूर जिल्ह्यात अनेकदा वाघाने नागरिकांवर किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या बातम्या तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. अशाच एका घटनेत बायकोला वाचवण्यासाठी एक व्यक्ती वाघाशी भिडल्याचे समोर आले आहे.

Chandrapur: नादच नाय करायचा... बायकोला सोडवण्यासाठी पठ्ठ्या थेट वाघाशीच भिडला, लोकं बेंबीच्या देठापासून किंचाळले... पुढे काय घडलं? चंद्रपुरातील हादरवणारी घटना
Chandrapur Tiger Attack
| Updated on: Sep 10, 2025 | 6:01 PM
Share

चंद्रपूर जिल्ह्यात अनेकदा वाघाने नागरिकांवर किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या बातम्या तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. आताही जिल्ह्यात वाघांची दहशत कायम आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मूल तालुक्यातील सोमनाथ भागातून एक दुःखद घटना समोर आली आहे. या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात 52 वर्षीय अन्नपूर्णा तुलसीराम बिलोने यांचा मृत्यू झाला आहे. समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रकल्पाच्या निवासी संकुलात ही घटना घडली आहे.

बायकोला सोडवण्यासाठी पठ्ठ्या वाघाशी भिडला

या घटनेबाबत माहिती देताना रेंज फॉरेस्ट ऑफिसर रामचंद्र शेंडे यांनी सांगितले की, सकाळी 5 वाजता अन्नपूर्णा आणि तिचे पती तुलसीराम हे दररोजच्या कामात व्यस्त होते. त्यावेळी अचानक झुडपातून एक वाघ बाहेर आला आणि त्याने अन्नपूर्णा यांच्यावर हल्ला केला. यावेळी पत्नीला वाचवण्यासाठी तुलसीराम हे वाघाशी भिडले. हातात काठी घेऊन त्यांनी वाघावर हल्ला केला, मात्र पत्नीला वाघाच्या जबड्यातून सोडवण्यात त्यांना अपयश आले. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमा झाले. गर्दी जमल्यानंतर वाघ अन्नपूर्णा यांना सोडून जंगलाकडे पळाला, मात्र तोपर्यंत अन्नपूर्णा यांचा मृत्यू झाला होता.

20,000 रुपयांची सुरुवातीची मदत

वन विभागाने मृत अन्नपूर्णा यांच्या कुटुंबाला 20 हजार रुपयांची सुरुवातीची मदत दिली आहे. रेंज फॉरेस्ट ऑफिसर रामचंद्र शेंडे यांनी म्हटले की, ‘या घटनेनंतर परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे, कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहेत. तसेच लोकांना सतर्क करण्यासाठी घोषणा दिल्या जात आहेत. या वाघाला पकडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यानंतर वाघाला पकडले जाईल.

वन विभागाची कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेल्याची ही पहिली घटना नाही. याआधी 4 सप्टेंबर रोजी पाथरी गावात शेतात काम करणाऱ्या 7 वर्षीय पांडुरंग भिकाजी चाचणे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने कारवाई करत 7 सप्टेंबर रोजी हल्ला करणाऱ्या वाघिणीला शांत करून पिंजऱ्यात बंद केले होते.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.