Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेसाठी दादांचं 200 कोटींच कॅम्पेन?, पाहा व्हिडीओ

अजित पवार रोज सकाळीच कामाला सुरुवात करतात. पण आज सकाळी सकाळीच दादा आपल्या आमदारांसह सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले. मात्र रोहित पवारांनी बाप्पाचं दर्शन म्हणजे, इव्हेंटचा भाग असल्याचं म्हटलंय. दादांच्या राष्ट्रवादीनं 200 कोटी मोजून नरेश अरोरा यांना निवडणुकीसाठी काम दिल्याचं दावा केलाय. वाचा त्यावरचा हा रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेसाठी दादांचं 200 कोटींच कॅम्पेन?, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 11:26 PM

आपले मंत्री आणि आमदारांसह अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. ऐरवी अजित पवारांना अशा प्रकारे क्वचितच मंदिरात बघितलं असेल. पण आता आपल्या सहकाऱ्यांसह दादांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी अजित पवारांनी अभिषेकही केला.

गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर, अजित पवारांनी विजयाची व्हिक्ट्री साईनही दाखवली. आणि त्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकीसाठी सिद्धिविनायकाकडे आशीर्वाद मागितल्याचंही सांगितलं. पाप करणाऱ्यांना सिद्धिविनायकाचे आशीर्वाद मिळत नाहीत, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली. तर, रोहित पवारांनीही डिवचण्याची संधी सोडली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं राजकीय रणनीतीकार नरेश अरोरांना काम दिलंय. सिद्धिविनायकाचं दर्शन हाही अरोरांना दिलेल्या 200 कोटींचं कॅम्पेनचा भाग आहे, असं रोहित पवार म्हणालेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही, अजित पवारांच्या इव्हेंटचा हा भाग असल्याचं म्हटलंय. राजकीय रणनीतीकार म्हणून याआधी प्रशांत किशोर यांची ओळख आहे. प्रशांत किशोर यांच्या सारखेच नरेश अरोरा हेही निवडणूक कॅम्पेनर आहेत. नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी design boxed.com चे सहसंस्थापक आहेत. राजस्थान आणि कर्नाटकसह इतर राज्यात काँग्रेससाठी त्यांनी निवडणूक प्रचाराचं काम केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत नरेश अरोरा उपस्थित होते. दादांच्या आमदारांना अरोरांनी पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनितीवर सविस्तर माहितीही दिली. लाडकी बहीण, 3 सिलेंडर मोफत, शेती पंपाला वीज बिल माफीसह योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 90 दिवसांचा रोडमॅप तयार करण्यात आलाय.

लोकसभा निवडणुकीत 4 पैकी एकच जागा अजित पवारांना जिंकता आली. बारामतीत सुनेत्रा पवारांचाही पराभव झाला..त्यामुळं विधानसभेसाठी अजित पवारांनी रणनीतीकाराला सोबत घेतलंय. नेत्याची इमेज बिल्डिंग करण्याचं काम निवडणूक कॅम्पेनर कडून केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेल्याचं विरोधकांचं म्हणणंय.

Non Stop LIVE Update
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?.
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?.
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण...
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण....
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो.
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत.
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य.
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा.
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले.
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान.
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?.