AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi mumbai international airport ला मुंबईकर कितीवेळात पोहोचणार? पुणेकरांना किती वेळ लागणार? जाणून घ्या

Navi mumbai international airport कधीपर्यंत सुरु होणार? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे काय फायदा होणार? सध्या मुंबई विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता काय आहे? जाणून घ्या.

Navi mumbai international airport ला मुंबईकर कितीवेळात पोहोचणार? पुणेकरांना किती वेळ लागणार? जाणून घ्या
Airport (Representative photo)
| Updated on: Jun 11, 2023 | 9:13 AM
Share

नवी मुंबई : मागच्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल एक महत्वाची अपडेट आहे. वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत हा विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. मुंबई महानगर क्षेत्रासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा गेम चेंजर ठरणार आहे. नवी मुंबई विमानतळाच पहिलं टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. मूळ योजनेपक्षा दुप्पट प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे.

सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील हवाई वाहतुकीचा सर्व भार मुंबई विमानतळावर आहे. जागेची कमतरता ही मुंबई विमानतळाची सर्वात मोठी समस्या आहे.

मुंबई विमानतळाची सध्याची क्षमता काय?

मुंबई विमानतळावरुन दरवर्षाला 4.8 कोटी प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन साधलं जाणार आहे.

जागतिक स्टॅण्डर्डनुसार विमानतळावर पोहोचायला किती वेळ लागला पाहिजे?

जागतिक स्टॅण्डर्डनुसार, शहरातील कुठल्याही प्रवाशाला डोमॅस्टिक विमानतळावर 45 ते 90 मिनिटात आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी टर्मिनलला 60 ते 120 मिनिटात पोहोचता आलं पाहिजे. मुंबई जवळच्या शहरातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुम्ही किती मिनिटात पोहोचू शकता त्याबद्दल जाणून घेऊया.

पुण्यावरुन किती वेळ लागणार?

पुण्यावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी 2 तास लागणार.

ठाण्यावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी 45 मिनिट लागणार.

मुंबईवरुन पोहोचण्यासाठी 1 तास लागणार.

अलिबागवरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी दीडतास लागेल. मुंबई महानगर क्षेत्रात किती गावं आणि किती महापालिका?

मुंबई महानगर क्षेत्र 6,640 Sq Km मध्ये पसरलं आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल या नऊ महापालिका या क्षेत्रात येतात. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, माथेरान, कर्जतस खोपोली, पेण, उरण, आणि अलिबाग या नऊ नगरपालिका यामध्ये मोडतात. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील 1000 गाव या मुंबई महानर क्षेत्रात येतात.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?