ना भाजप, ना सेना, ना स्वाभिमानी, हातकणंगलेत जनसुराज्यचा सभापती, नाट्यमय घडामोडी

ना भाजप, ना सेना, ना स्वाभिमानी, हातकणंगलेत जनसुराज्यचा सभापती, नाट्यमय घडामोडी

भाजप,स्वाभिमानी आणि शिवसेनेच्या सहकार्यानं जनसुराज्य पक्षाच्या डॉ. प्रदीप पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ( BJP Jansurajya Party)

Yuvraj Jadhav

|

Jan 23, 2021 | 4:14 PM

कोल्हापूर: हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजप,स्वाभिमानी , शिवसेनेच्या सहकार्यानं जनसुराज्य पक्षाच्या डॉ. प्रदीप पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तीन पक्षांनी एकत्र येत आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवलं. (BJP Swabhimani and Shivsena came together to support Jansurajya party at Hatkanangale)

ताराराणी पक्षाच्या महेश पाटलांचा राजीनामा

हातकणंगले पंचायत समितीमध्ये भाजप 6 ,जनसुराज्य 5,ताराराणी पक्ष 5, स्वाभिमानी पक्ष 3,शिवसेना 2 आणि काँग्रेस 1 असे 22 सदस्य आहेत.तत्कालीन सभापती महेश पाटील हे ताराराणी पक्षाचे होते.त्यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप करत 16 सदस्यांनी जिल्हाअधिकारी यांचेकडे सभापतीवर अविश्वास ठराव दाखल केला होता.त्यानंतर तडजोडीचे प्रयत्न निष्फळ झाल्यान सभापती महेश पाटील यांनी राजीनामा दिला होता.

सर्वसाधारण गट असल्यानं इच्छुकांची मांदियाळी

सभापती निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. सभापती पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्यान इच्छुकांची मांदियाळी होती. ताराराणी पक्षानं पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप,जनसुराज्य बरोबर संधान साधण्याचा प्रयत्न केला होता.पण. सभापती महेश पाटील यांच्या एकतर्फी भ्रष्ट कारभारामुळ अनेक सदस्यांनी आवाडे यांच्या ताराराणी पक्षाला सोबत घेण्यास तीव्र विरोध केला. गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि ताराराणी पक्षाला बाजुला ठेवण्याचा निर्णय घेणायत आला.

जनसुराज्य 5,भाजप 5,स्वाभिमानी 3,आणि शिवसेना 2 अशा एकूण 15 सदस्यांनी एकत्र येऊन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील,आमदार विनय कोरे ,माजी आमदार अमल महाडीक ,माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या आदेशानुसार जनसुराज्य पक्षाचे डॉ. प्रदीप पाटील यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला. सभापती पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्यान तहसीलदार प्रदिप उबाळे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषणा केली. यावेळी जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. यावेळी समीप कदम,अरुणराव इंगवले ,अशोकराव माने,राजु माने,यांचेसह भाजप,जनसुराज्य चे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

वारंवार सभापती बदल

हातकणंगले पंचायत समितीत 22 सदस्य असून भाजप 6, जनसुराज्य 5 ,ताराराणी 5, काँग्रेस 1, स्वाभिमानी पक्ष 3,शिवसेना 2, असं पक्षीय बलाबल होते. सुरवातीस भाजप,जनसुराज्य ,काँग्रेसन एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. एक वर्षानंतर सभापतीनी राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा आघाडी होऊन जनसुराज्य, भाजप आणि काँग्रेस यांचीच एक वर्ष सत्ता राहिली.सभापतींनी राजीनामा दिल्यानंतर विद्यमान आघाडीत बिघाडी झाली आणि स्वाभिमानी ,ताराराणी ,शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत भाजप आणि जनसुराज्य पक्षाला सत्तेपासून दुर केलं. दरम्यान, ताराराणीच्या सभापतींवर शौचालय घोटाळ्याचा आरोप करत 16 सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला.पण सभापतींनी तात्काळ राजीनामा दिल्यान अविश्वास प्रक्रीया रद्द झाली.

संबंधित बातम्या:

बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी हिंदुत्व शिकवू नये – भाजप

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवार-फडणवीस आमनेसामने!, शिवाजी कर्डीले पुन्हा रिंगणात

‘शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी शक्य ते सर्व करु’, भाजपचे प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

(BJP Swabhimani and Shivsena came together to support Jansurajya party at Hatkanangale)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें