Ambernath Sloganeering : अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदे समर्थक एकवटले, छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी

| Updated on: Jun 28, 2022 | 7:41 PM

शिंदे समर्थकांनी केलेल्या या शक्तिप्रदर्शनावेळी शहरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील, त्याला आमचं समर्थन असल्याचंही यावेळी शिंदे समर्थकांनी सांगितलं.

Ambernath Sloganeering : अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदे समर्थक एकवटले, छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी
अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदे समर्थक एकवटले
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये शिंदे समर्थक (Shinde Supporters) एकवटले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी (Sloganeering) केली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे देखील त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आहेत. यानंतर दोन दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये आमदार किणीकर यांच्याविरोधात अज्ञातांनी ‘हो मी गद्दार आहे’ असा मजकूर असलेले स्टिकर्स लावले होते. या पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील शिवसेनेतल्या शिंदे समर्थक गटाने आज शक्तिप्रदर्शन केलं.

शिंदे समर्थकांनी केलेल्या या शक्तिप्रदर्शनावेळी शहरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील, त्याला आमचं समर्थन असल्याचंही यावेळी शिंदे समर्थकांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी

माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, उत्तर भारतीय आघाडीचे शहर संघटक प्रमोदकुमार चौबे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे समर्थक एकत्र आले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला संपवण्याची सुपारी घेतली असून, शिंदे साहेबांनी याविरोधात केलेल्या बंडाला आमचं समर्थन असल्याचं यावेळी शिंदे समर्थकांनी सांगितलं. (Eknath Shinde supporters sloganeering at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in Ambernath)

हे सुद्धा वाचा