आधी राज्यपालांची भेट, नंतर दिल्लीत अमित शाहांसोबत एकाच मंचावर, ‘दादा’ खरंच भाजपात जाणार?

"राज्यपालांना तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर तुम्हाला भेटावच लागेल", असं गांगुलीने सांगितलं (Amit Shah and Sourav Ganguly on one stage).

आधी राज्यपालांची भेट, नंतर दिल्लीत अमित शाहांसोबत एकाच मंचावर, 'दादा' खरंच भाजपात जाणार?
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 3:41 PM

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. विशेष म्हणजे गांगुलीने काल (27 डिसेंबर) पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतली. त्यानंतर आज (27 डिसेंबर) गागुंली दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एकाच मंचावर दिसले. त्यामुळे गांगुली खरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे (Amit Shah and Sourav Ganguly on one stage).

दिल्लीत कोटला मैदान येथे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात अमित शाह आणि सौरव गांगुली एकत्र दिसले. दरम्यान, गांगुलीने राज्यपालांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. “राज्यपालांना तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर तुम्हाला भेटावच लागेल”, असं गांगुलीने सांगितलं (Amit Shah and Sourav Ganguly on one stage).

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपकडून सौरभ गांगूलीला राजकीय आखाड्यात उतरवलं जाईल, अशा चर्चा सुरु आहेत. भाजप सौरभ गांगुलीच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या इराद्यात आहे. मात्र, गांगुलीकडून याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सौरभ गांगुलीच अमित शाहांचे बंगालचे भूमिपुत्र?

अमित शाह यांनी कोलकाता दौऱ्यादरम्यान बंगालचा भूमिपुत्रच बंगालचा मुख्यमंत्री होईल, असं सूचक विधान केलं होतं. त्यामुळे बंगालचा भूमिपुत्र सौरभ गांगुलीच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या बाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार वैशाली डामलिया यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे वैशाली यांचे गांगुली कुटुंबाशी चांगले संबंध आहे. याशिवाय टीएमसीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बाहेरचे लोक बोलल्यावर वैशाली यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत

अमित शाहांचा 12 जानेवारीला बंगाल दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव देखील बीसीसीआयचे पदाधिकारी आहेत. मात्र, त्याबाबतच्या संबंधांबाबत सौरभ गांगूलीकडून कधीच कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दुसरीकडे अमित शाह 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हावडा येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात काही लोकांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांनी राजकीय पर्यटकांच्या भूलथापांना बळी पडू नये, राहुल गांधींच्या परदेश दौर्‍यावरुन भाजपचा टोला

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.