AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टुलकिट प्रकरण भोवलं; भाजप नेते संबित पात्रांवर ट्विटरची कारवाई

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये टुलकिट प्रकरणावरून वाद सुरू आहेत. (BJP spokesperson Sambit Patra’s toolkit tweet tagged ‘manipulative’)

टुलकिट प्रकरण भोवलं; भाजप नेते संबित पात्रांवर ट्विटरची कारवाई
Sambit Patra
| Updated on: May 21, 2021 | 12:26 PM
Share

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये टुलकिट प्रकरणावरून वाद सुरू आहेत. या प्रकरणी ट्विटरने भाजपचे नेते, प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने पात्रा यांच्या या ट्विटला ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ म्हटलं आहे. म्हणजे संबित पात्रा यांनी केलेलं ट्विट हे तथ्यात्मकदृष्ट्या योग्य नसल्याचं ट्विटरने म्हटलं आहे. (BJP spokesperson Sambit Patra’s toolkit tweet tagged ‘manipulative’)

ट्विटरने टुलकिट प्रकरणी कारवाई करताना संबित पात्रा यांच्या ट्विटला टमॅनिप्युलेटेड मीडिया मार्कट केलं आहे. ट्विटर पॉलिसीनुसार एखाद्या ट्विटची माहिती अचूक नसेल आणि उपलब्ध माहितीही चुकीची असेल तर अशा प्रकारचा लेबल लावला जातो. व्हिडीओ, ट्विट, फोटो किंवा इतर कोणत्याही कंटेन्टमध्ये हे लेबल लावले जाते. या आधी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या अनेक ट्विटला हे लेबल लावण्यात आले होते. त्यानंतर ट्रम्प यांचं अकाऊंट कायमस्वरुपी रद्द करण्यात आलं होतं.

काय होतं ट्विट?

संबित पात्रा यांनी 18 मे रोजी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी कोरोना संकटात काँग्रेसकडून टुलकिटद्वारा मोदींची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा दावा केला होता. एका पीआर कंपनीद्वारे काही बुद्धिजीवींच्या माध्यमातून मोदींच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला होता.

वाद सुरूच

दरम्यान, टुलकिटप्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरूच आहेत. भाजपचे सर्व आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपच्या नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा म्हणून काँग्रेसने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना चिठ्ठीही लिहिली आहे. काँग्रेसच्या एनएसयू या विद्यार्थी संघटनेने पात्रांविरोधात केसही दाखल केली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही भाजपवर जोरदार टीका केली होती. (BJP spokesperson Sambit Patra’s toolkit tweet tagged ‘manipulative’)

संबंधित बातम्या:

दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी

Narada Sting: सीबीआयच्या याचिकेत ममता बॅनर्जींचंही नाव, राज्याबाहेर खटला वर्ग करण्याची मागणी

नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणींवर एफआयआर दाखल करा; काँग्रेसची दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे मागणी

(BJP spokesperson Sambit Patra’s toolkit tweet tagged ‘manipulative’)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.