मोठी बातमी! भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका, युद्ध सुरू असताना मोठा निर्णय, थेट अमेरिकेच्या शत्रूसोबत डील

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्ध सुरू असतानाच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, मोटी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका, युद्ध सुरू असताना मोठा निर्णय,  थेट अमेरिकेच्या शत्रूसोबत डील
donald trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 27, 2026 | 7:25 PM

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मूज स्ट्रीट बंद केल्यामुळे जगावर मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. भीषण गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या संकटातून भारत देखील सुटू शकलेला नाहीये. भारतात देखील गॅस तुटवडा जाणवत आहे. व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे, यामुळे हॉटेल व्यावसायिकाचं प्रचंड नुकसान होत आहे. संभाव्य गॅस आणि इंधन टंचाई लक्षात घेऊन आता भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असणार आहे.

काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेमध्ये एक व्यापारी करार झाला होता, या व्यापारी करारानंतर भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी कमी केली होती. मात्र आता मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. आता या पार्श्वभूमीवर भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवण्याच्या विचारात आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवू नये, यासाठी भारत आता रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शक्यता आहे.

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार भारतानं पुन्हा एकदा रशियासोबत असलेले आपले संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेनं पाऊल पुढे टाकलं आहे. रिपोर्टनुसार भारत आणि रशियामध्ये आता लिक्विफाइड नॅचलर गॅस (LNG) च्या पुरवठ्याबाबत एका मोठ्या डील संदर्भात बोलणी सुरू आहेत. रशियाच्या युक्रेनसोबतच्या युद्धानंतर हे पहिल्यांदाच घडत आहे. याबाबत भारतानं अमेरिकेला देखील माहिती दिली आहे. एवढंच नाही तर आता भारत आपल्या एकूण गरजेपैकी तब्बल 40 टक्के कच्चं तेल रशियाकडून खरेदी करण्याच्या विचारात आहे. 2026 च्या शेवटपर्यंत भारत रशियाकडून आपल्या एकूण गरजेच्या 40 टक्के कच्चं तेल आयात करण्याची शक्यता आहे. जर भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली तर हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असणार आहे. रशिया -युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं रशियावर अनेक निर्बंध लादले होते. मात्र सध्या कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अमेरिकेनं अनेक देशांना रशियाकडून कच्च तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us