AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हमास, हाफिज आणि मसूद… या त्रिकुटाने रचली पहलगाम हल्ल्याची स्क्रिप्ट, कुठे झाली होती सभा?

सूत्रांच्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी 2025 रोजी रावलकोट येथील शहीद साबिर स्टेडियममध्ये काश्मीर एकता दिनाच्या नावाखाली एक असा मेळावा झाला, ज्यामध्ये भारताविरुद्ध उघडपणे विष पसरवले गेले. या बैठकीनंतर काही दिवसांनीच 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.

हमास, हाफिज आणि मसूद… या त्रिकुटाने रचली पहलगाम हल्ल्याची स्क्रिप्ट, कुठे झाली होती सभा?
terror attackImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 25, 2025 | 12:15 PM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची स्क्रिप्ट यावेळी पीओकेमध्ये लिहिली गेली होती. आणि तीही अशा मंचावरून, जिथे लष्कर, जैश आणि हमाससारख्या कट्टर दहशतवादी संघटनांचे मोठे चेहरे एकत्र उपस्थित होते. सूत्रांनुसार, यामध्ये हजारोंच्या संख्येने लष्कर आणि जैशचे दहशतवादी उपस्थित होते, ज्यामध्ये भारताचे मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची नावेही सामील आहेत.

5 फेब्रुवारी 2025 रोजी रावलकोट येथील शहीद साबिर स्टेडियममध्ये काश्मीर एकता दिनाच्या नावाखाली एक मेळावा झाला, ज्यामध्ये भारताविरुद्ध उघडपणे विष पसरवले गेले. या कार्यक्रमानंतर काही दिवसांनीच पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.

वाचा: शिमला करार नेमका काय आहे? जो रद्द करण्याची धमकी पाकिस्तान देत आहे

पीओकेमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे व्हीव्हीआयपी स्वागत

या कार्यक्रमातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हमासच्या दहशतवाद्यांना प्रथमच पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) अशा प्रकारे मंच मिळाला. डॉ. खालिद कददूमी, जो इराण (तेहरान) मध्ये हमासचा प्रतिनिधी आहे, तो स्वतः या कार्यक्रमात सहभागी झाला. त्याच्यासोबत इतर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान हमासच्या ‘अल अक्सा फ्लड ऑपरेशन’ला भारतविरोधी जिहादच्या रूपात सादर करण्यात आले.

लष्कर-जैशचे टॉप कमांडरही उपस्थित

या दहशतवादी मेळाव्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचे मोठे चेहरे सहभागी झाले होते. हाफिज सईदचा मुलगा स्टेजवर उपस्थित होता. मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ, जैशचा लॉन्चिंग कमांडर असगर खान काश्मिरी, जैश कमांडर मसूद इलयासी या बैठकीत हजर होते. लष्कर-ए-तय्यबाचे अनेक वरिष्ठ कमांडरही यात सहभागी झाले होते. या सर्वांनी मिळून भारताविरुद्ध भडकाऊ भाषणे दिली आणि काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यांसाठी चिथावणी दिली.

‘काश्मीरला बनवा गाझा’चे आवाहन

या मेळाव्यात काश्मीरची तुलना गाझाशी करत त्याला ‘जिहादचे पुढील मैदान’ असे संबोधले गेले. हमासच्या दहशतवाद्यांना भारतविरोधी संघटनांशी जोडून एक सामायिक ‘इस्लामिक प्रतिरोध’ची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंचावरून जिहादच्या नावाखाली दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी आणि हल्ले करण्यासाठी उकसवले गेले. ज्या पद्धतीने हमास, लष्कर आणि जैशचे चेहरे एकाच मंचावर एकत्र आले आणि काश्मीरला पुढील गाझा बनवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावरून हे स्पष्ट आहे की भारताविरुद्ध एक नवीन ‘दहशतवादी युती’ तयार झाली आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.