रस्त्यावरुन धावत सुटला, लिफ्टसाठीही नको म्हणाला! त्याच्या नकार देण्याचं कारणं फार अर्थपूर्ण आहे, नीट समजून घ्या

| Updated on: Mar 20, 2022 | 7:57 PM

Video : Pradeep Mehra : या व्हिडीओमध्ये रस्त्यावर धावणाऱ्या मुलाचं नाव आहे प्रदीप मेहरा. प्रदीम दहा किलोमटर धावत सुटलाय. रात्रीचे बारा वाजलेत. दहा किलोमीटर धाऊन तो घरी जाणार. त्यानंतर जेवणं बनवणार.

रस्त्यावरुन धावत सुटला, लिफ्टसाठीही नको म्हणाला! त्याच्या नकार देण्याचं कारणं फार अर्थपूर्ण आहे, नीट समजून घ्या
लिफ्ट नाकारणारा प्रदीप मेहरा...
Image Credit source: Twitter Video Grab
Follow us on

लाईफ ऑफ पाय… हा सिनेमा तुम्हाला माहीत असेल. आयुष्य जेव्हा आपल्याकडचं सगळं आपल्यापासून हिरावून घेतलं, तेव्हा वाटतं सगळं संपून गेल्यासारखं वाटतं. पण अशाच वेळी एक गोष्ट आपल्यासमोर आयुष्य आणून ठेवते आणि जगण्याचा संघर्ष पुन्हा सुरु ठेवण्यासाठी आपल्याला धीर देत राहते. प्रत्येकालाच हा संघर्ष जमतो, असंही नाही. लाईफ ऑफ पायनं (Life of Pi) हेच सांगण्याचा प्रयत्न केला. काही जण संघर्ष (struggle) करताना मध्येच हार मानतात. पण काही जण संघर्षाला आत्मसाद करुन घेतात. समोर कितीही चांगले उत्तर पर्याय उभे ठाकले, तरिही आपल्या आयुष्यात संघर्ष हीच एकमेव गोष्ट कायम आहे, हे स्वीकारुन आपलं जगणं (life) सुरु ठेवतात. त्यामुळे एक मजबूत विचार तर आपलं जगणं कठीण प्रसंगातही अधिक मजबूत करतो. शिवाय समोर कितीही आकर्षित करणाऱ्या, भुरळ पाडण्याच्या गोष्टी समोर आल्या, तरिही त्याकडे विचलीत होण्याची शक्यता पूर्णपणे संपवून टाकतो.

ही सगळी विचलीत न होण्याची किमया प्रदीपला साधता आली. दहा किलोमीटर धावत तो निघालाय. पाठीवर एक बॅग आहे. चेहऱ्यावर हासू आहे. त्याला लिफ्ट देण्यासाठीही एक माणूस ऑफरही करतोय. पण प्रदीप विनम्रपणे ही ऑफर नाकारतो. आपलं धावणं सुरुच ठेवतो. वर वर ही गोष्ट सामान्य वाटत असेलही. पण असं करण्यासाठीही विचारांची पक्की बैठक लागते. ती प्रदीपनं कमावलेली आहे, हे दिसून येतं.

काय आहे नेमका सगळा प्रकार?

विनोदी कापरी यांनी आपल्या ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ते एकाला लिफ्ट देण्यासाठी ऑफर करतात. रात्री बारा वाजताच्या सुमारास नोएडा रस्त्यावर एक मुलगा त्यांना बिचारा पाठीवर बॅग घेऊन धावत सुटल्याचं दिसतं.

काहीतरी अडचण असेल म्हणून विनोद कापरी त्याला लिफ्ट ऑफर करतात. तो मुलगा लिफ्ट नाकारतो म्हणून ते त्याला सारखी विनवणी करतात. पण हा मुलगा आपल्या धावत जाण्यावरच ठाम असतो. गाडीत बसायला तो नकारच देत राहतो. गाडीत बसायला नकार देणाऱ्या या मुलाशी तसाच पुढे संवाद सुरु राहतो. यातून या मुलाचं व्यक्तिमत्त्व आणखी उलगडतं.

कोण आहे हा मुलगा?

या व्हिडीओमध्ये रस्त्यावर धावणाऱ्या मुलाचं नाव आहे प्रदीप मेहरा. प्रदीम दहा किलोमटर धावत सुटलाय. रात्रीचे बारा वाजलेत. दहा किलोमीटर धाऊन तो घरी जाणार. त्यानंतर जेवणं बनवणार. आणि मग तो ते खाणार.

प्रदीपचं वय आहे 19 वर्ष. आपल्या मोठ्या भावा सोबत तो रहतोय. त्याची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. दररोज प्रदीप दहा किलोमीटर धावत घरी जातो. पुढे जाऊन त्याला आर्मीमध्ये भर्ती व्हायचंय. त्यासाठी त्यानं धावण्याचा सराव सुरु ठेवलाय.

घरी जाऊन जेवण करणार कधी, तो ते खाणार कधी म्हणून त्याला जेवणाहीची ऑफर देतात. पण जर मी तुमच्याबरोबर जेवलो तर माझा मोठा भाऊ काय खाईल, असा प्रतिप्रश्न प्रदीप करतो.

लिफ्ट नाकारणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ व्हायरल करण्याबाबतही विनोद कापरी त्याला विचारतात. तेव्हा मी काहीच चुकीचं करत नाहीये, असं म्हणत तो आपल्या भूमिकेवर ठाम राहतो. पण गाडीत काही बसत नाही. नेमका हा सगळा संवाद काय होतो, ते समजून घेण्यासाठी एकदा हा व्हिडीओ पाहावाचा लागेत..

बघा, नेमकं काय घडलं..

दोन मिनिटं वीस सेकंदाच्या या व्हिडीओनं तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास विनोद कापरी यांनी व्यक्त केलाय. हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला असून अनेकांनी हे ट्वीट रिशेअर केलंय. आपल्या स्वप्नांसाठी धावणाऱ्या प्रदीपनं अनेकांना आपल्या प्रेमात पाडलंय. लिफ्ट नाकारणाऱ्या या मुलाची गोष्ट प्रत्येकाला अंतर्मुख करतेय.

संबंधित बातम्या :

भावा जिंकलस! इशानच्या भावानं त्याच्यासाठी केलेला त्याग हा इशानला लावलेल्या बोलीपेक्षा मोठाय

The Kashmir Files: विवेक अग्निहोत्रींनी सेन्सॉर बोर्डावर असल्याचा घेतला फायदा? काय आहे सत्य?

लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं, पावसातल्या सभेवरून मुनगंटीवार आघाडीवर धो-धो बरसले