आधी केंद्राची नोटीस, नंतर निवृत्ती, त्यानंतर थेट CMच्या मुख्य सल्लागारपदी; एका IAS अधिकाऱ्यासाठी ममतादीदींची केंद्रावर कुरघोडी

कोलकात्यातील मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय यांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अखेर संपली आहे. (West Bengal Chief Secretary Retires; Mamata Banerjee Appoints Him as Chief Advisor)

आधी केंद्राची नोटीस, नंतर निवृत्ती, त्यानंतर थेट CMच्या मुख्य सल्लागारपदी; एका IAS अधिकाऱ्यासाठी ममतादीदींची केंद्रावर कुरघोडी
Alapan Bandhapodhyay
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 8:40 PM

कोलकाता: कोलकात्यातील मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय यांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अखेर संपली आहे. केंद्र सरकारने बंद्योपाध्याय यांना प्रतिनियुक्तीवर केंद्रात बोलावून घेतलं. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना दिल्लीत पाठवण्यास नकार दिला. बंद्योपाध्याय यांनीही दिल्लीत जाणं टाळलं. त्यामुळे त्यांना केंद्राने कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची तयारी सुरू केली. पण त्याआधीच बंद्योपाध्याय यांनी रिटारयमेंट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आणखी एक डाव टाकत बंद्योपाध्याय यांना थेट त्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले. त्यामुळे मुख्य सचिवांना आपल्याकडे खेचण्याच्या या नाट्यावर अखेर पडदा पडला. (West Bengal Chief Secretary Retires; Mamata Banerjee Appoints Him as Chief Advisor)

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव म्हणून अलापन बंद्योपाध्याय यांची सेवा कधीच संपली होती. परंतु ममता बॅनर्जी यांनी त्यांना तीन महिन्याची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे केंद्राने त्याला मंजुरीही दिली. मात्र कलाईकुंडामधील पंतप्रधानांच्या बैठकीतील वादानंतर बंद्योपाध्याय यांची दिल्लीत बदली करण्यात आली होती. त्यांना आज सकाळी 10 वाजता दिल्लीत रुजू व्हायचे होते. मात्र, बंद्योपाध्याय गेले नाही. आपल्याशी सल्लामसलत न करता केंद्राने हा निर्णय घेतल्याने ममता बॅनर्जी यांनी बंद्योपाध्याय यांना सोडण्यास नकार दिला. तसेच या प्रतिनियुक्तीवर पुनर्विचार करण्याचं आवाहन ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केलं होतं.

कारणे दाखवा नोटीस

बंद्योपाध्याय आज सकाळी 10 वाजता दिल्लीत ड्युटीवर हजर झाले नाहीत. त्यामुळे केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याविरोधात लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच बंद्योपाध्याय यांनी निवृत्ती घेतली आहे.

मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त

बंद्योपाध्याय यांनी निवृत्ती घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांना तात्काळ त्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. विद्यमान गृहसचिव एचके द्विवेदी यांना मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर, बीपी गोपालिका यांच्याकडे गृह सचिव विभागाची सूत्रे देण्यात आली आहेत.अलापान बंद्योपाध्याय यांची ही नियुक्ती तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यांना महिन्याला अडीच लाख रुपये वेतन देण्यात येणार आहे. (West Bengal Chief Secretary Retires; Mamata Banerjee Appoints Him as Chief Advisor)

संबंधित बातम्या:

एक IAS अधिकारी, ज्यावर ममता-मोदींची टक्कर जारी, मुख्य सचिव वादाच्या भोवऱ्यात

ममतादीदींनी मोदींना अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन् निघून गेल्या

Cyclone Yaas: PM मोदींकडून ओडिशा, बंगाल अन् झारखंडला 1000 कोटींची आर्थिक मदत

(West Bengal Chief Secretary Retires; Mamata Banerjee Appoints Him as Chief Advisor)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.