
IPL मुळे प्रसिद्धी झोताता आलेल्या मिस्ट्री गर्ल्समध्ये आरती बेदी देखील सामिल आहे. 2022 मध्ये आरती मिस्ट्री गर्ल म्हणून चर्चेत आली. त्यानंतर अनेकांना कळलं ती की अभिनेत्री आहे...

चेन्नई टीमची चाहती श्रृती तुली देखील यंदाच्या IPL मध्ये चर्चेत आली. ज्यामुळे एका रात्रीत श्रृती हिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली.

रियाना लालवानी देखील तुफान चर्चेत आली होती. IPL मुळे सर्वत्र फक्त आणि फक्त रियाना हिची चर्चा रंगली. ज्यामुळे एका रात्रीत रियाना हिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली.

पंजाब टीमसोबत प्रत्येक सामन्यात दिसणारी मिस्ट्री गर्ल शशी धीमन हिची देखील सर्वत्र चर्चा रंगली होती... शशी टीमच्या सोशल मीडिया पेजसाठी एँकरिंगचं काम करते.

IPL 2023 मध्ये मोहाली येथील साहिबा मिस्ट्री गर्ल म्हणून तुफान चर्चेत आली होती. साहिबा एक आर्टिस्ट आणि फॅशन ब्लॉगर आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.