
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती पूर्व पती भरत तख्तानीसोबत दिसली. भरत आणि ईशा यांनी घटस्फोट घेतला आहे.

ईशा देओल आणि तिचा पूर्व पती भरत तख्तानी हे ऋषीकेशमधील परमार्थ निकेतन याठिकाणी एकत्र पोहोचले होते. याठिकाणी त्यांनी एकत्र गंगा आरतीसुद्धा केली.

यावेळी ईशाने पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. परमार्थ निकेतनमध्ये ती भक्तीत लीन झाली होती. पूर्व पती भरतसोबत ती फार खुशसुद्धा दिसत होती.

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच ईशा आणि भरतला एकत्र पाहिलं गेलं. या दोघांना एकत्र पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हे दोघं पुन्हा एकत्र आले आहेत का?

ईशा आणि भरत यांना एकत्र पूजा करताना पाहिलं गेलं. याठिकाणी दोघांनी स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांचा आशीर्वाद घेतला.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 रोजी लग्न केलं होतं. या दोघांना दोन मुली आहेत. एकीचं नाव राध्या आणि दुसरीचं नाव मिराया आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं.