‘मेरी जिंदगी है तू’चा शेवटचा एपिसोड ‘या’ दिवशी होणार प्रसारित; भारतीय चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'मेरी जिंदगी है तू' या पाकिस्तानी ड्रामाची प्रचंड क्रेझ भारतातही पहायला मिळतेय. या ड्रामाचा शेवटचा एपिसोड कधी प्रसारित होणार, याची उत्सुकता असतानाच आता तारीख जाहीर झाली आहे.

| Updated on: Mar 22, 2026 | 3:22 PM
1 / 6
ईद जवळ येताच 'मेरी जिंदगी है तू' या पाकिस्तानी ड्रामाचे चाहते त्याच्या शेवटच्या एपिसोडची आतुरतेने प्रतीक्षा करू लागले. या पाकिस्तानी ड्रामाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 14 मार्च रोजी या ड्रामाचा सेकंड लास्ट म्हणजेच 33 वा एपिसोड प्रसारित झाला होता.

ईद जवळ येताच 'मेरी जिंदगी है तू' या पाकिस्तानी ड्रामाचे चाहते त्याच्या शेवटच्या एपिसोडची आतुरतेने प्रतीक्षा करू लागले. या पाकिस्तानी ड्रामाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 14 मार्च रोजी या ड्रामाचा सेकंड लास्ट म्हणजेच 33 वा एपिसोड प्रसारित झाला होता.

2 / 6

या ड्रामाचा फिनाले एपिसोड 21 मार्च रोजी म्हणजेच ईदच्या दिवशी प्रसारित होणार होता. परंतु ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अनेकजण ईदच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असतील, त्यामुळे एपिसोडला अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही, असा विचार करून निर्मात्यांनी तारीख पुढे ढकलली आहे.

3 / 6

'मेरी जिंदगी है तू' या ड्रामाचा शेवटचा एपिसोड आता 22 मार्च रोजी प्रसारित होणार आहे. शोचा टीआरपी आणि व्ह्युअरशिप वाढवण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. कामयार आणि आयराच्या कथेचा शेवट गोड होईल का, हे शेवटच्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

4 / 6

फिनाले एपिसोडविषयी समोर आलेली आणखी एक खास गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना डबल एपिसोड पहायला मिळणार आहे. म्हणजेच 'मेरी जिंदगी है तू'चा दोन तासांचा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. या ड्रामामध्ये हानिया आमिर आयराच्या भूमिकेत असून अभिनेता बिलाल अब्बास खान हा कामयारची भूमिका साकारतोय.

5 / 6

आयरा आणि कामयार यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. या पाकिस्तानी ड्रामाची कथा प्रेम, नाती आणि आयुष्यातील आव्हानांभोवती फिरते. आयरा आणि कामयारच्या लव्ह स्टोरीचा शेवट गोड असेल की कडू, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

6 / 6

भारतात राहणारे प्रेक्षक 'मेरी जिंदगी है तू' हा पाकिस्तानी ड्रामा युट्यूबवर पाहू शकतात. युट्यूबवर त्याचे आधीचे 33 एपिसोड्ससुद्धा उपलब्ध आहेत. 'टॉप पाकिस्तानी ड्रामास' या युट्यूब चॅनलवर हा ड्रामा पहायला मिळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us