AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंचितचा पुन्हा आघाडीला झटका, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 25 जागा पडल्या

वंचितने महाराष्ट्रात भोपळाही फोडलेला नसला, तरी त्यांच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली (Congress ncp Lost) आहे.

वंचितचा पुन्हा आघाडीला झटका, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 25 जागा पडल्या
| Updated on: Oct 26, 2019 | 11:36 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत. त्यानंतर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसला 44 जागा (Maharashtra assembly election result 2019) मिळाल्या आहेत. मनसेचाही विधानसभेत 1 आमदार निवडून आला (Congress ncp Lost) आहे. तर वंचितने महाराष्ट्रात भोपळाही फोडलेला नसला, तरी त्यांच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली (Congress ncp Lost) आहे.

विधानसभा निवडणुकांच्या मतांच्या आकडेवारीच्या आधारेच ही माहिती समोर आली आहे. वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जवळपास 25 जागांवर पराभव झाला. यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही वंचितचा पुन्हा आघाडीला झटका दिला आहे.

अकोला पश्चिम, आर्णी, बल्लापूर, चिखली, चिमूर, धामणगाव रेल्वे, खामगाव, नागपूर दक्षिण, पुणे कँटोन्मेंट, राळेगाव, शिवाजीनगर-पुणे, तुळजापूर, यवतमाळ, चांदिवली, मुंबई, चेंबूर, नांदेड उत्तर या ठिकाणी काँग्रेसला वंचितमुळे पराभवाचा सामना करावा लागला.

तर राष्ट्रवादीला चाळीसगाव, दौंड, गेवराई, जिंतूर, खडकवासला-पुणे, माळशिरस, उल्हासनगर, उस्मानाबाद आणि पैठण या ठिकाणी वंचितमुळे फटका बसला आहे.

चिमूर मतदारसंघात काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांना 77 हजार 349 मतं मिळाली. तर भाजपच्या बंटी बांगडियांना 87 हजार 146 मतं मिळाली. या ठिकाणी भाजपचा 9 हजार 752 मताधिक्यांनी विजय झाला. तर वंचितच्या अरविंद सांदेकर यांना 24 हजार 474 मतं मिळाली.

दरम्यान जर आपण काँग्रेसची 77 हजार 394 आणि वंचितची 24 हजार 474 मतं एकत्रित केली, तर ती जवळपास 1 लाख 1 हजार 868 होतात. या मताच्या विभाजनाचा फटका आघाडीला बसला आहे. तर याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला झाल्याचं दिसतं (Congress ncp Lost) आहे.

यानुसार विधानसभेत महाआघाडीच्या जागा वाढल्या असल्या, तरी तो आकडा आणखी वाढू शकला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्षांना 105 जागा मिळाल्या आहेत. जर वंचितमुळे झटका बसलेल्या 25 जागा अधिक केल्या. तर त्या जागा 130 होतात.

वंचित बहुजन आघाडीला यावेळी 25 लाख 7 हजार मतं पडली. लोकसभा निवडणुकीत आघाडीला 8 ते 10 जागांवर फटका बसला होता. त्यानंतर आताही तसाच परिणाम काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागांवर झाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.