Video: संजय राठोडांचा नैतिकतेच्या आधारावर पक्षाकडं राजीनामा, चौकशीनंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील: गुलाबराव पाटील

| Updated on: Feb 16, 2021 | 2:58 PM

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चौकशी नंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलेय. (Gulabrao Patil Sanjay Rathod Resignation)

Video: संजय राठोडांचा नैतिकतेच्या आधारावर पक्षाकडं राजीनामा, चौकशीनंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील: गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री
Follow us on

जळगाव: शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असंही ते म्हणाले. शिवसेना नेते तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची मला आताच माहिती मिळाली, असेही पाटील यांनी सांगितले. (Gulabrao Pail comment on Sanjay Rathod Resignation Pooja Chavan Suicide Case)

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात घेतले जात असल्याने त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा पक्षाकडे दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. येणाऱ्या काळात या प्रकरणाच्या चौकशीत ‘दूध का दूध, पाणी का पाणी होईल’, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं चौकशी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. चौकशीत काय निष्पन्न होते? त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतीलच. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात काय निष्पन्न होते, ते पाहणे महत्त्वाचे असेल. तपासाआधीच आपण कोणाला शिक्षा करू शकत नाही. तपासात जर काही निष्पन्न झाले तर मीच नव्हे तर कुणालाही बोलण्याची गरज राहणार नाही. आपोआप गुन्हा दाखल होईल, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

संजय राठोड यांचा राजीनामा मातोश्रीकडे

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या:

Dhananjay Munde Case | ‘मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’, गुलाबराव पाटील मैदानात

आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत : गुलाबराव पाटील

(Gulabrao Pail comment on Sanjay Rathod Resignation Pooja Chavan Suicide Case)