अहमदनगरच्या जागेवरुन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं घोडं चार जागांवर अडलं असल्याची माहिती आहे. याबाबत दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात बैठकही झाली. पण अहमदनगरच्या जागेवरुन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, ही जागा काँग्रेसला हवीय आणि राष्ट्रवादी अहमदनगरची जागा सोडण्यासाठी तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. आघाडीमध्ये अहमदनगरची […]

अहमदनगरच्या जागेवरुन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता
Follow us on

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं घोडं चार जागांवर अडलं असल्याची माहिती आहे. याबाबत दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात बैठकही झाली. पण अहमदनगरच्या जागेवरुन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, ही जागा काँग्रेसला हवीय आणि राष्ट्रवादी अहमदनगरची जागा सोडण्यासाठी तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

आघाडीमध्ये अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. पण विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनी मतदारसंघातला जनसंपर्क वाढवला असून विविध कार्यक्रमांचंही ते आयोजन करत आहेत. पण राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही असल्यामुळे सुजय विखेंचं काय होणार हा प्रश्नच आहे.

युतीची चर्चा पुढे सरकेना

16 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपलाय. आता निवडणुका घोषित होणारच आहेत. मात्र युती असो की आघाडी कोणाचंही काही झालेलं नाही. नेतेही कन्फ्युज आणि नेत्यांमुळे जनताही कन्फ्युज आहे. सर्वात आधी युतीबद्दल बोलूया….युतीवरुन रोज नवनवे फॉर्म्युले येत आहेत आणि शिवसेनेकडून भाजपची कोंडी करणं सुरु आहे. शिवसेनेने इशान्य मुंबईतून भाजपच्या किरीट सोमय्यांना विरोध केलाय. तर मावळमध्ये भाजपने शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंना विरोध केलाय.

आघाडीचीही डोकेदुखी

महाराष्ट्रात महाआघाडीचं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचंही काही पक्कं झालेलं नाही आणि त्याचं कारण आहे सोबत येणाऱ्या मित्रपक्षांचे इशारे आणि दबावतंत्र. भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी सहा ठिकाणी उमेदवार घोषित केलेत. आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 12 जागांची मागणी केली आहे. तर खासदार राजू शेट्टींनी महाआघाडीला सात दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. शेट्टींनी सात जागांची मागणी केली असून चार जागांवरही समाधानी असू असं त्यांचं म्हणणं आहे.

सीपीएमही महाआघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. दिंडोरी मतदारसंघ न सोडल्यास सीपीएमने पालघरमध्ये लढण्याची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. मात्र मागण्या पाहता प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टींचं समाधान करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यातच मनसेबद्दल अजूनही खलबतं सुरुच आहेत.