Priya Berde Join NCP | अभिनेत्री प्रिया बेर्डेंसह कलाकारांची फौज राष्ट्रवादीत, रुपाली चाकणकर म्हणतात….

| Updated on: Jul 04, 2020 | 9:13 PM

चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे लवकरच राजकारणात एंट्री (Marathi Actress Priya Berde Will Join NCP) करणार आहेत.

Priya Berde Join NCP | अभिनेत्री प्रिया बेर्डेंसह कलाकारांची फौज राष्ट्रवादीत, रुपाली चाकणकर म्हणतात....
Follow us on

पुणे : चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे लवकरच राजकारणात एंट्री (Marathi Actress Priya Berde Will Join NCP) करणार आहेत. येत्या 7 जुलैला प्रिया बेर्डे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबतची माहिती दिली.

यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यांचं मी स्वागत करते. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून नाट्यपरिषदेला केलेली मदत, कलाकार, लोक कलावंतांच्या खात्यात जमा केलेली रक्कम असेल. कोव्हिडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस कलाकारांच्या पाठिशी उभा राहिली. शरद पवार, सुप्रिया ताई, अजित पवार यांनी प्रत्येक घटकाचा विचार केला.

त्यामुळे प्रिया बेर्डे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादी हा पक्ष आपला पक्ष वाटतो. राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि कला विभागाच्या वतीने सातत्याने कलाकारांच्या समस्या सोडवल्या जातात. या विभागाच्या वतीने प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळेल, त्यांचं मी स्वागत करते,” असे रुपाली चाकणकर  म्हणाल्या.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

प्रिया बेर्डे यांच्यासह अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार (Marathi Actress Priya Berde Will Join NCP) आहेत.

“पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी भरीव करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग हा उपयुक्त ठरू शकतो,” अशी प्रतिक्रिया प्रिया बेर्डे यांनी दिली होती.

“यामुळे मी अनेक चित्रपट निर्माते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवू शकते,” असा विश्वास प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केला होता.

प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार आहे. त्या सध्या पुण्यातच असून लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहे. त्यामुळे त्यातूनच त्या नव्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोण आहेत प्रिया बेर्डे? 

  • प्रिया बेर्डे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1967 रोजी झाला.
  • अशी ही बनवाबनवी या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
  • त्यांनी रंगत संगत, अशी ही बनवा बनवी, एक गाडी बाकी अनाडी, अफालतून, बजरंगाची कमाल, जत्रा यासारख्या चित्रपटात काम केले.
  • सध्या त्या पुण्यात लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवतात.

संबंधित बातम्या : 

शिवसेनेला धक्का, पाच नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Pankaja Munde | भाजपची कार्यकारणी जाहीर, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया