काँग्रेसच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या खासदाराचीही निवडणुकीतून माघार?

मुंबई : 2014 साली मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले. त्यातील एक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि दुसरे म्हणजे राजीव सातव. दोघांनी महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभा निवडणूक शाबूत ठेवण्याचं काम केलं. मात्र, आगामी निवडणुकीत दोन्ही विद्यमान खासदार माघार घेण्याची दाट शक्यता आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघावर अशोक चव्हाण यांचं वर्चस्व आहे. महापालिकेपासून लोकसभेपर्यंत अशोक चव्हाण […]

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या खासदाराचीही निवडणुकीतून माघार?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : 2014 साली मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले. त्यातील एक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि दुसरे म्हणजे राजीव सातव. दोघांनी महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभा निवडणूक शाबूत ठेवण्याचं काम केलं. मात्र, आगामी निवडणुकीत दोन्ही विद्यमान खासदार माघार घेण्याची दाट शक्यता आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघावर अशोक चव्हाण यांचं वर्चस्व आहे. महापालिकेपासून लोकसभेपर्यंत अशोक चव्हाण हे सर्व निवडणुका जिंकत आलेत. मात्र, मोदी लाटेत जिंकण्याचा पराक्रम केलेल्या अशोक चव्हाणांनी यावेळी मोदी लाट नसतानाही माघार घेतल्याची चर्चा आहे. नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने राज्यभर प्रचाराला फिरावं लागणार आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघात फार लक्ष देता येणार नाही.

काँग्रेसने महाराष्ट्रात दुसरी जागा जिंकली होती, ती म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघाची. काँग्रेसचे युवानेते राजीव सातव हे मोदी लाटेतही हिंगोलीतून जिंकले होते. मात्र, यावेळी राजीव सातवही निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा आहे.

राजीव सातव हे सध्या काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी आहेत. गुजरातमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आमदार राजीनामे देऊन, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गुजरातमधील लोकसभेच्या जागा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे गुजरातमध्येच काम करण्याची खासदार राजीव सातव यांची इच्छा आहे.

मात्र, हिंगोलीतून निवडणूक लढवायची की गुजरातमध्ये काम करायचे, याचा निर्णय खासदार राजीव सातव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यवर सोपवला आहे. त्यामुळे राहुल गांधी हेच राजीव सातव यांच्याबाबत अंतिम निर्णय घेतील.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें