सोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई

वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर पोलिसांनी ताफ्यातील 8 गाड्यांवर कारवाई केली आहे.

सोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई

सोलापूर : वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर पोलिसांनी ताफ्यातील 8 गाड्यांवर कारवाई केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा दौरा सुरु आहे. या दरम्यान सोलापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात हजर राहिल्या होत्या. यावेळी ही कारवाई करण्यात आली.

सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसीएशनच्या सभागृहात सुप्रिया सुळे यांचा ‘संवाद ताईंशी’ कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे हजर राहिल्या होत्या. या कार्यक्रमाच्या हॉल बाहेर सुळे यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता. या ताफ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे सोलापुर पोलिसांनी ताफ्यातील 8 गाड्यांवर कारवाई केली. प्रत्येक गाडीवर दोनशे रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सोलापुरातील डफरीन चौक हा रहदारीचा भाग आहे. येथे रस्त्या शेजारी सभागृह आहे. त्यामुळे सर्व गाड्या या रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या होत्या. रस्त्यावर गाड्या उभ्या केल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या गाड्या येथून हलवण्याच्या सूचना दिल्या. सूचना देऊनही गाड्या न हल्ल्याने पोलिसांनी सर्व गाड्यांवर कारवाई केली. मोटर वाहन कायद्यानुसार या सर्व गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

सभागृहाजवळ कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. तसेच या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी दिली होती. तसेच परवानगी असतानाही पोलिसांनी जाणिवपूर्वक कारवाई केली, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सध्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर नाराजी दर्शवली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *