Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणावेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या

| Updated on: May 26, 2021 | 12:15 PM

आज वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आहे (Chandra Grahan 2021). यावेळी सुपरमून होणार आहे. अडीच वर्षांनी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला असेल.

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहणावेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या
Lunar Eclipse
Follow us on

मुंबई : आज वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आहे (Chandra Grahan 2021). यावेळी सुपरमून होणार आहे. अडीच वर्षांनी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला असेल. दरम्यान, लोक चंद्रग्रहणाच्या रात्री रेड ब्लड मून पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जरी, चंद्रग्रहण एक खगोलीय घटना असली, तरी त्याशी संबंधित काही ज्योतिषीय प्रथा, मान्यता आणि श्रद्धा आहेत. काही लोकप्रिय मान्यता या गर्भवती महिलांशी संबंधित आहे (Chandra Grahan 2021 Is On 26th May 2021 What Should Pregnant Women Do And What Not To Do During Lunar Eclipse).

बऱ्याच ज्योतिष विद्वानांचा असा विश्वास आहे की गर्भवती स्त्रियांनी चंद्रग्रहणादरम्यान बाहेर पडू नये, तर काहीजण थेट ते पाहण्यास नकार देतात. दुसरीकडे, बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की जर त्या रात्री स्त्रिया चंद्राखाली गेल्या तर त्यांच्या मुलाचा जन्म कुठल्या चिन्हासह होऊ शकतो.

चंद्रग्रहणादरम्यान गर्भवती महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे आणि काय करु नये जाणून घ्या –

चंद्रग्रहण म्हणजे काय?

पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण असते, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत अगदी जवळून संरेखित होतात आणि पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते. हे थेट सूर्यप्रकाशाला चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते, ज्यामुळे त्यावर छाया पडते. दरम्यान, जेव्हा पृथ्वी चंद्राला पूर्णपणे अवरुद्ध करते तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये चंद्रग्रहण कोणत्याही विशेष संरक्षणाशिवाय पाहिले जाऊ शकते.

चंद्रग्रहण 2021 : यावेळी गर्भवती महिलांनी काय करावे?

चंद्रग्रहणावेळी ग्रभवती महिलांनी घरातच राहावं

त्यांनी फक्त ताजे अन्न खावे.

त्यांनी काहीतरी दान करावे.

घराच्या आत किरणांपासून वाचण्यासाठी खिडक्या जाड पडद्यांनी झाकून ठेवल्याची खात्री करा.

त्यांनी चंद्रग्रहणापूर्वी आणि नंतर दोन्हीवेळी स्नान करावे.

चंद्रग्रहण 2021 : या कालावधीत गर्भवती महिलांनी काय करु नये?

ग्रहणावेळी झोपेत किंवा कोणत्याही कार्यात सहभागी होऊ नये

आकाशाकडे पाहणे टाळा.

प्रवास करणे टाळा.

बरेच लोक असे म्हणतात की ग्रहण काळात महिलांनी पाणी पिऊ नये. परंतु नंतर ते वैद्यकीयदृष्ट्या फिट होऊ शकत नाही. म्हणूनच, या सर्वांचं पानल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन याची खात्री करा.

Chandra Grahan 2021 Is On 26th May 2021 What Should Pregnant Women Do And What Not To Do During Lunar Eclipse

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहण कसे पाहावे आणि काय खबरदारी घ्यावी?

Chandra Grahan 2021 : या पूर्ण चंद्रग्रहणाला ‘सुपर ब्लड मून’का म्हणतात?