AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dreams Interpretation | तुम्हाला पडणाऱ्या सहस्यमयी स्वप्नांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या रंजक माहिती

स्वप्नात कधी दु:ख येते तर कधी आनंद. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या सर्व स्वप्नांचा नेमका अर्थ काय असतो. चला तर मग जाणून घेऊयात तुमची स्वप्न तुम्हाला काय सांगतात.

Dreams Interpretation | तुम्हाला पडणाऱ्या सहस्यमयी स्वप्नांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ? जाणून घ्या रंजक माहिती
Dream Interpretation shubh ashubh sanket
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 3:35 PM
Share

मुंबई : स्वप्न (Dreams)शास्त्रानुसार, झोपेत असताना आपण जी स्वप्ने पाहतो, ती आपल्याला भविष्याबद्दल (Future)अनेक प्रकारची संकेत देणारी असतात. स्वप्नांमध्ये बर्‍याच वेळा आपण अशा काही गोष्टी पाहतो, ज्यामुळे आपले मन खूप विचलित होते. तर, अशीही काही स्वप्ने असतात जी, आपल्याला आंतरिक आनंद किंवा पूर्ती देतात. सहसा आम्हाला फक्त तीच स्वप्ने आठवतात, जी अत्यंत भयानक किंवा अतिशय आनंददायक असतात. जगातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या वेळी काही ना काही स्वप्न पाहत असते . स्वप्नात कधी दु:ख येते तर कधी आनंद. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या सर्व स्वप्नांचा नेमका अर्थ काय असतो. चला तर मग जाणून घेऊयात तुमची स्वप्न तुम्हाला काय सांगतात.

स्वप्नात मोर पाहण्याचा अर्थ जर तुम्हाला स्वप्नात मोर दिसला तर त्याला शुभ चिन्ह असते. कारण भगवान श्रीकृष्णाला मोर खूप आवडतो आणि ते त्याचे पंख कपाळावर लावत असत. तुमच्या स्वप्नात मोरपंख दिसण्याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर दैवी कृपेचा वर्षाव होणार आहे. तुमची रखडलेली कामं ही पुर्ण होतील.

स्वप्नात कावळा पाहण्याचा अर्थ जर तुम्ही आर्थिक संकटात धावत असाल आणि स्वप्नात तुम्हाला एक कावळा पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे उडताना दिसला तर समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठूनतरी पैसा मिळणार आहे. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला कावळा दिसला तर ते परीक्षेतील यशाचे संकेत देते.

स्वप्नात हंस पाहण्याचा अर्थ जर तुम्हाला स्वप्नात हंस दिसला तर ते शुभ चिन्ह मानले पाहिजे. असे मानले जाते की जर स्वप्नात हंस असेल तर ते तुमचे भाग्य दर्शवते. म्हणजे स्वप्नात हंस दिसला तर समजावे की काहीतरी चांगले किंवा आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे.

स्वप्नात देव पाहण्याचा अर्थ जर तुम्हाला स्वप्नात तुमची आराध्य देवता दिसली तर त्याला शुभ चिन्ह समजा. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या काही मोठ्या चिंता किंवा जीवनाशी संबंधित मोठ्या समस्यांचे निराकरण होणार आहे. तुम्ही लवकरच चिंतामुक्त होणार आहात.

स्वप्नात पिवळे पुस्तक मिळण्याचा अर्थ रात्री झोपताना स्वप्नात तुम्हाला एखादे पुस्तक देताना दिसले किंवा कुठेतरी पिवळ्या रंगाचे पुस्तक दिसले तर ते तुमच्या भाग्याचे लक्षण समजा. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये पूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे.

स्वप्नात अंत्ययात्रा दिसणे शुभ या संदर्भात बोलताना ज्योतिषी राजेश शुक्ला यांनी स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींच्या अर्थाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. अनेकांना झोपेच्या वेळी स्वप्नात एखादी अंत्ययात्रा दिसते, अशी स्वप्न बघून लोक खूप घाबरतात. काही लोक स्वप्नात अंत्ययात्रा दिसणे अशुभ मानतात. मात्र, स्वप्न शास्त्रात स्वप्नात दिसणारी अंत्ययात्रा अतिशय शुभ मानली जाते.

स्वप्नात समुद्र किंवा पूर पाहण्याचा अर्थ स्वप्नात समुद्र , पूर किंवा घाण पाणी पाहणे शुभ मानले जात नाही . असे स्वप्न पाहिल्यानंतर, व्यक्तीने अत्यंत सावधपणे जीवन जगले पाहिजे आणि आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे .

स्वप्नात जंगल पाहण्याचा अर्थ स्वप्नात जंगल पाहणे शुभ मानले जाते . विशेषतः जर जंगल हिरवे असेल तर ते भविष्यात यश आणि आर्थिक लाभ दर्शवते, परंतु कोरड्या झाडांनी भरलेले जंगल आपल्या जीवनात काही अघटीत घटना दर्शवते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या : 

Astro Remedies of Jaggery | नोकरी हवीय ? घरात सतत वाद होत आहेत मग पुराणात सांगितलेले गुळाचे हे 5 उपाय नक्की वापरुन पाहा

Tulsi Benefits | भगवान विष्णूच्या आवडत्या तुळशीचे धार्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या रंजक गोष्टी

27January 2022 Panchang | 27 जानेवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​कसा जाईल दिवस?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.